नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनर याने या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि गुन्हा लपवण्यासाठी तिचे डोके दगडाने ठेचून निर्घृण हत्या(murder) केली, असा धक्कादायक तपासात निष्कर्ष समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून परिसरात भीती, संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

मुलीचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण हळहळून गेले. प्राथमिक तपासात आरोपीचा मुलीच्या वडिलांशी महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा सूडभ्रम या भयानक कृत्यामागे (murder)असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने आरोपी विजय खैरनरला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्फत खटला लढवला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
या अमानुष घटनेविरोधात जिल्हाभरात संतापाची लाट उसळली असून लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने शांततेचा मूक मोर्चा काढून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. शिवाजी चौकातून पोलिस ठाण्यापर्यंत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नोंदवली. तसेच ऑल इंडिया पँथर सेनेच्याही प्रतिनिधींनी पोलिसांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. संपूर्ण जिल्ह्यात ही घटना अत्यंत संताप आणि दुःखाने चर्चेत आहे.

हेही वाचा :
राज्यातल्या ‘या’ भागातील शाळांच्या वेळेत बदल…
9 कोटी शेतकऱ्यांची आज भरणार ‘झोळी’, PM Modi देणार 2 हजार
विकी-कतरिनाच्या बाळाचा फोटो होतोय व्हायरल, पण…