बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ हे अलीकडेच आई-बाबा झाले आहेत. 7 नोव्हेंबर रोजी कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या सोशल मीडियावर विकी आणि कतरिना यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत ते बाळासोबत(baby) दिसत असून हा त्यांच्याच मुलाचा फोटो असल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे या फोटोमागचे सत्य जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर कलाकारांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. मात्र त्यातील सगळेच फोटो खरे असतील असे नाही. अलीकडे AI चा वाढलेला वापर आणि त्यामुळं कलाकारांची प्रायव्हसी धोक्यात आली आहे. सध्या विकी-कतरिना यांचा AI फोटो व्हायरल होतोय. यात फोटोत विकीची आईदेखील दिसत आहे. त्यामुळं अनेकांना हे फोटो खरे वाटत आहेत.

व्हायरल झालेल्या एका फोटोत कतरिना आणि विकीने बाळाला घेतलं आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कतरिना दिसत आहे तर विकीने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर, पांढऱ्या रंगाच्या दुपट्यात गुंडाळलेले बाळ त्यांच्या हातात दिसत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत हॅपी फॅमिली,अनेक आशीर्वाद अशा कमेंट केल्या आहेत. मात्र खरं तर हा फोटो AI ने जनरेट केलेला आहे.

तर, दुसऱ्या एका फोटोत विकी आणि कतरिना यांच्यामध्ये त्यांची आई बसली असून त्यांनी बाळाला(baby) घेतलं आहे. तर विकी आणि कतरिना या फोटोत खूपच आनंदी दिसत आहे. विकीची आईदेखील फोटोत दिसत असल्यामुळं अनेकांना हा फोटो खरा वाटत आहे. मात्र हा फोटोदेखील AI ने तयार करण्यात आलेला आहे. या फोटोंवरही विकी-कतरिनाच्या चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर विकी आणि कतरिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली होती. “Our bundle of joy has arrived. With immense love and gratitude, we welcome our baby boy. 7th November 2025. Katrina & Vicky, अशी पोस्ट विकीने केली आहे. तसंच, अलीकडे कतरिना आणि बाळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

हेही वाचा :

आज १९ नोव्हेंबर २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

नखांचे आरोग्य सुधारण्यासाठी तांदळाचे पाणी कसे वापरले जाते? जाणून घ्या…

सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *