नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईलगतच्या वसईत घडली आहे. मामानेच त्याच्या सख्या 16 वर्षांच्या भाचीला चालत्या लोकल ट्रेनमधून धक्का देऊन तिची हत्या केली आहे. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला तेव्हा भयंकर सत्य उघडकीस आलं आहे. या प्रकरणी सोमवारी दुपारी 28 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या मामासोबत चर्चगेट-विरार लोकलने प्रवास करत होती. लोकल भाईंदर-नायगावच्या मध्ये आल्यानंतर आरोपीने 16 वर्षांच्या तरुणीला लोकलमधून (local train)धक्का दिला. त्यानंतर तरुणी रेल्वे रूळांवर पडली. डोक्याला जबर मार लागल्याने तरुणीने जागीच जीव गमावला.

अल्पवयीन तरुणीही तिच्या आईसह आणि भावासह मानखुर्द येथे राहते. शनिवारी ती बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. रविवारी त्यांना कळलं की ती तिच्या वालीवयेथील मामाच्या घरी गेली आहे. जेव्हा तिची मोठी काकू तिला परत आणण्यासाठी गेली तेव्हा ती पुन्हा गायब झाली होती, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर रविवारी रात्री तिच्या कुटुंबीयांनी वालिव स्थानकात अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. सोमवारी, आरोपीने मुलगी त्याच्यासोबत असल्याचे फोनकरुन आईला कळवलं होतं. त्यानंतर काहीवेळातच तो दुपारी 2.05 वाजता भाईंदर येथे तिच्यासोबत चर्चगेट-विरार ट्रेनमध्ये चढला होता. ट्रेन (local train)नायगावजवळ येताच त्याने तिला चालत्या ट्रेनमधून ढकलले त्यामुळं ती जागीच ठार झाली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि अल्पवयीन मुलीमध्ये अनैतिक संबंध होते. मामासोबत लग्न करण्यासाठी ती पळून वसईला आली होती. मात्र अल्पवयीन तरुणी जेव्हा पळून त्याच्याकडे आली तेव्हा त्याला ही मोठी जबाबदारी डोक्यावर ओझं म्हणून बनेल असं वाटलं. म्हणून त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला.आरोपीचे नाव अर्जुन सोनी असं असून तो वसईतील एका कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करतो. जेव्हा त्याने अल्पवयीन मुलीला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिलं तेव्हा ट्रेनमधील नंदू झा या प्रवाशाने ही घटना प्रत्यक्ष पाहिली होती. जेव्हा त्याने या घटनेबाबत इतर प्रवाशांना सांगितले तेव्हा आरोपीला पकडून वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

परिणिती चोप्रा-राघव चड्ढाने लेकाचं नाव केलं जाहीर; अर्थ आहे फारचं छान!

संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद…

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *