आज भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.(celebrating) देशभर उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक भारतीय हा दिवस एका उत्सवाप्रमाणे साजरा करत आहे. 1947 साली याच दिवशी देशाला 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान, देशाची प्रगती आणि एकतेचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग 12 व्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून….

आज भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशभर उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक भारतीय हा दिवस एका उत्सवाप्रमाणे साजरा करत आहे. 1947 साली याच दिवशी (celebrating)देशाला 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान, देशाची प्रगती आणि एकतेचे प्रतीक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग 12 व्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवला. त्यानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ‘नवा भारत’ अशी आहे, ज्याचे उद्दिष्ट 2047 पर्यंत भारताला समृद्ध, सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवणे आहे.
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला खास बनवण्यासाठी 5000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये स्पेशल ऑलिंपिक्स 2025 चे खेळाडू, शेतकरी, सरपंच, युवा लेखक आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. सोहळ्यादरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा गौरव केला जाणार असून, राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग असणार आहे.
या सोहळ्यात देशभरातून 85 सरपंच सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या कर्तव्य पथावर विविध राज्यांच्या सुंदर चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले. लाल किल्ल्याच्या परिसरात 11,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात असून, सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे, दिल्ली वाहतूक पोलिसांनी काही मार्गांमध्ये बदल केले आहेत, जे सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा :
ChatGPT च्या सगळ्या चॅट्स एकाच वेळी कशा डिलीट कराल? ही सोपी ट्रिक वापरा
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज, ऑस्ट्रेलिया रोखणार?
Independence Day 2025 च्या निमित्तानं लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच… असं नक्की काय ज्याची होतेय इतकी चर्चा