उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आग्रातील बर्हान येथे दिवाळीसाठी घरी आलेल्या एका तरुणाला त्याच्या वहिणीने एका खोलीत बोलावले आणि त्याचा गुप्तांग(private) कापला गेला. जखमी योगेशवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दीराच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया झाली असून रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

बर्हान स्टेशन हाऊस ऑफिसर, गुरुविंद्र सिंह यांनी सांगितले की, योगेश सध्या एम्समध्ये उपचार घेत आहे. योगेश कुमार हा हल्द्वानी येथील एका सिमेंट कंपनीत काम करतो. दिवाळी साजरी करण्यासाठी तो रविवारी सुट्टी घेऊन घरी परतला होता. सोमवारी त्याने कुटुंबासह पूजा केली. त्यानंतर तो हॉलमध्ये झोपी गेला. कुटुंबाचा आरोप आहे की, योगेशची वहिणी तिच्या खोलीत तीन मुलांसह झोपली होती. पहाटे २ वाजताच्या सुमारास तिने त्या तरुणाला तिच्या खोलीत बोलावले आणि नंतर त्याचे गुप्तांग कापले.
योगेश ओरडला तेव्हा त्याचे कुटुंब जागे झाले. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. तरुणाला गंभीर अवस्थेत दिल्लीत दाखल करण्यात आले. योगेशवर दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. वहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वहिणीने तिच्या दीराला गुप्तांग(private) कापल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दीरीने तक्रारीत लिहिले आहे की, वहिणी अर्चना तिच्या दीराला तिच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी कुटुंबावर दबाव आणत होती. मात्र दीराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, म्हणून रागाच्या भरात वहिणीने दीराचा गुप्तांग कापले.
गावकऱ्यांनी सांगितले की योगेश शिक्षित होता आणि एका प्रतिष्ठित कंपनीत काम करत होता. वहिणीला त्याचे लग्न तिच्या धाकट्या बहिणीशी करायचे होते, परंतु कुटुंबाने त्या तरुणाचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होते. यामुळे संतापलेल्या वहिणीने हा गुन्हा केला.

हेही वाचा :
‘शिंदेंचं फडणवीसांशी जमत नाही’ म्हणत मोठं विधान; ‘शिंदेंचे किमान 35 आमदार भाजपामध्ये…’
50-60 तासाने होणार विनाश? उपसागरात चक्रीवादळ
‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय