विवाहितेनं आत्महत्या(suicide) केल्याच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं असून, या प्रकरणी महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येच्या या प्रकरणात निवडणूकीचाही अप्रत्यक्ष संबंध असल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.

निवडणुकीसाठी आणि पतीच्या व्यवसायाकरता सासऱ्याने दहा लाख मागितल्याने सुनेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर इथं घडली. प्राथमिक माहितीनुसार आर्दशनगर येथे टीईटी परीक्षेच्या अभ्यासावरील ताणातून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. मात्र, निवडणुकीसाठी सासऱ्यानं आणि व्यवसायासाठी पतीनं पैशांची मागणी केल्यानं सुनेनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड इथं ही घटना घडली. कौसर गरगरे असं मृत महिलेचं नाव असून सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेच्या माहेरकडील कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींवर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, माहेरच्यांकडून होणाऱ्या आरोपांनंतर महिलेस आत्महत्येला(suicide) प्रवृत्ती केल्याप्रकरणी सासरा, सासु, पती आणि जाऊविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28, दोघेही रा. कुरुंदवाड) यांना यानंतर अटक करण्यात आली. तर, सासू मुमताज गरगरे, सासरा राजमहंमद गरगरे यांना मात्र अद्याप अटक नाही अशी माहिती मिळत आहे.

कौरस यांच्या माहेरच्या मंडळींना त्यांच्या आत्महत्येबाबत शंका आल्याने महिलेच्या भावाने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणात पतीच्या व्यवसायाकरिता आणि सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला असा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान महिलेच्या पतीनं (इंजमाम राजमहंमद गरगरे) फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षेचा अपेक्षित अभ्यास न झाल्यानं मानसिक तणावामुळं कौसरनं राहत्या घराच्या बेडरुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. तर, माहेरच्या मंडळींनी मात्र आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप केल्यानं आता या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा :

स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका…

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो

लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *