कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
काही असे असतात की की त्यांना नेमके वास्तव काय आहे(moving)ते माहीत नसते किंवा माहीत असूनही तिकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.अशी मंडळी मूर्खाच्या नंदनवनात वावरत असतात, फिरत असतात. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि त्यांचे एकही युद्ध जिंकलेले नाही पण त्यांना पाकिस्तानचे फिल्ड मार्शल म्हणतात ते मुनीर, माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोयांचा सध्या या नंदनवनात फेरफटका सुरू आहे. तसे नसते तर त्यांनी तीन महिन्यापूर्वी भारताकडून सडकून मार खाऊनहीभारताविरोधी गरळ ओकण्याचे धाडस केले नसते. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले फिल्डमार्शलमुनीर मिया यांनी आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत. त्याचा आम्ही भारताविरुद्धच्या युद्धात वापर केला तर अर्धे जग नष्ट होईल असा इशारा दिला आहे.

तो देत असताना आपण हा इशारा जगातील निम्म्याहून अधिक राष्ट्रांना देत आहोत याचे त्यांना भान राहिलेले नाही. अमेरिकेच्या भूमीवरून अर्ध्या जगालाअन्वस्त्राची धमकी देणाऱ्या या मुनिरमियाना अमेरिकेने कडक समज देणे आवश्यक होते पण ट्रम्प महाशयांनातितकी समज नाही. किंवा त्यांनी भारताविरुद्ध बोलते ना तर बोलू दे अशी भूमिका घेतली असावी. (moving)मात्र अमेरिकेच्या पेटेगान च्या निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानचा हा मुनीर म्हणजे लष्करी गणवेशातीलओसामा बिन लादेन असल्याचे म्हटले आहे.एप्रिल महिन्यात पहेलगाम येथे दहशतवादी पाठवून निरापराध पर्यटकांची हत्या करण्याचे दुसाहस केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरहीतेथील पंतप्रधान शहाबाज शरीफ हे काही शहाणपणा शिकलेले नाहीत. युद्ध थांबवा अशा शब्दात शरणागती पत्करणाऱ्या शहाबाज शरीफ यांनी लष्कर प्रमुख मुनीर मिया यांच्याकडून आपल्या सिंहासनाला धोका आहे हे ओळखून त्यांना फिल्ड मार्शल किताबत दिली आहे.

ज्या लष्कर प्रमुखांने लष्करासाठी असीम त्याग केलेला आहे, (moving)युद्ध जिंकून दिले आहे त्यालाच फिल्ड मार्शल की ताब्यात दिली जाते, पण यापैकी कोणतीही पात्रता नसताना हे पद मिळाल्यानंतर मुनीर हे स्वतःला जगातील बलवान लष्कर प्रमुख समजू लागले आहेत.भारताने पाकिस्तान बरोबरचा सिंधू जल करार स्थगित केला आहे आणि हा वॉटर बॉम्ब मूळ बॉम्ब पेक्षाहीखतरनाक ठरला आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे स्पष्ट करून भारताने हा करार स्थगित केला आहे. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी याच मुद्द्यावरून भारत कधीही विसरणार नाही असा चांगला धडा शिकवू अशी वल्गना केली आहे. पण जेव्हा हा जलकरार स्थगित केला तेव्हा अशीच पोकळ धमकी भारताला दिली गेली होती. प्रत्यक्षात त्यांचे धाडस झाले नाही.
त्यानंतर अवघ्या चार दिवसात दाती तृण घेऊन पाकड्यांना भारतासमोर शरण यावे लागले. कोणत्याही स्थितीत हल्ले थांबवा अशी गयावया करावी लागली. भारताने अघोषित युद्ध करण्यापूर्वी अवघ्या 22 मिनिटं पाकिस्तान मध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून टाकले होते. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते. त्यानंतर आम्ही गप्प बसणार नाही हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने ड्रोन च्या माध्यमातून क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न हवाई सुरक्षा कवच प्रणालीने आकाशातच मोडून काढला.त्यानंतर भारताने लागलेल्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या अण्वस्त्र तळापर्यंत पल्ला गाठला होता. त्यांच्या अन्न वस्त्र कार्यक्रमाची हानी केली होती.
अवघ्या दोन महिन्यात पाकिस्तान हे सर्व विसरलेला आहे. भारताने आम्ही जगाला हादरवून टाकणारी क्षेपणास्त्रे बनवतो आणि ती अनेक राष्ट्रांना विकतो. शस्त्र विक्रीमध्ये भारत हा इतर प्रगत राष्ट्रांच्या पंगतीमध्ये जाऊन बसलेला आहे हेशस्त्रास्त्र विक्रीच्या आकडेवारीवरून भारताने जगाला दाखवून दिले आहे.भारताच्या तुलनेत भिकेचे कटोरे घेऊन फिरणारा पाकिस्तान हा भारताच्या जवळपासही येऊ शकत नाही. तुलना तर अजिबात होऊ शकत नाही. भारत हा जगातील चौथी आर्थिक सत्ता बनला आहे आणि आता त्याची वाटचाल तिसऱ्या स्थानाकडे सुरू आहे. भारताची ही दैदीप्यमान वाटचाल अमेरिकेचे विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याडोळ्यात खुपते आहे.
म्हणूनच ते भारताची अर्थव्यवस्था मृतवत असल्याचे धादांत खोटेवक्तव्य करू लागले आहेत.भारत हा आपल्या दबावाखाली येत नाही हे लक्षात येऊ लागल्यानंतर ट्रम्प महाशय हे पाकिस्तानला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. प्रोटोकॉल पायाखाली ठेवून या महाशयांनी पाकचे लष्कर प्रमुख मुनिर यांना वाईट हाऊस मध्ये मेजवानी दिली होती. ही त्यांची कृती भारताचा अपमान करणारी होती. ट्रम्प यांनी मोदी यांना आंतरराष्ट्रीय परिषदेवरून माघारी फिरताना अमेरिकेला यावे हे दिलेले आमंत्रणटाळण्यामागे हेच कारण होते.भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध टेरिफ कार्ड वरून काहीसे ताणले गेल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान, तसेच फील्ड मार्शल वगैरे मंडळी भारताविरुद्ध युद्ध छेडण्याची भाषा करू लागले आहेत.सपाटून मार खाऊन काही महिने गेलेले नाहीत तोवर अशी भाषा करणारी ही मंडळी नक्कीच मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असे म्हणावे लागेल. कारण या मंडळींना वास्तव काय आहे आणि आपण कुठे आहोत याचे भान राहिलेले नाही.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल