महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा (students) देणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गट-क सेवा परीक्षेअंतर्गत येणाऱ्या ‘लिपिक टंकलेखक’ आणि ‘कर सहाय्यक’ या पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २० मे २०२६ रोजी त्याबाबत अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.या निर्णयामुळे परीक्षेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही आयोगाकडून स्वतंत्र कौशल्य चाचणी घेतली जात होती. त्यामुळे निकाल प्रक्रियेला उशीर होत होता आणि उमेदवारांवर अतिरिक्त ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने ही स्वतंत्र चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमानुसार, उमेदवारांना आता फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. (students) मुख्य परीक्षेनंतर कोणतीही अतिरिक्त टंकलेखन चाचणी घेतली जाणार नाही. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारेच अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी जाहीर केली जाईल. यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
तसेच, उमेदवारांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी आता थेट शासन स्तरावर,(students) नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. मात्र, अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. दरम्यान, आयोगाचा हा निर्णय गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ साठीही लागू करण्यात आला आहे. या परीक्षेची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून, मुख्य परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ आहे. या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा
शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?
वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला