कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी या हत्तीणीला गुजरातच्या वनतारा कल्याण केंद्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हलवण्यात आल्यानंतर त्यावर सुरू झालेल्या राजकारण आता थंडावलं आहे, पण आता मुंबईतील “कबूतरखाना” राजकारणाने उसळी मारलेली आहे. या विषयावर वर न्यायालयात आता किमान चार आठवडे सुनावणी होणार नाही, तोपर्यंत बंदी राहणार आहे आणि त्यावर मराठी विरुद्ध अमराठी असं राजकारण सुरू झाल आहे
आणि त्याला मुंबई महापालिका निवडणुकीची झालर आहे(Independence Day). आता आणखी एका नव्या खाद्य संस्कृतीशी निगडित असलेल्या विषयावरून राजकारण सुरू झाल आहे.

दिनांक 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी(Independence Day) परमिट रूम, बियर बार, वाईन शॉप बंद असतात. त्याला “ड्राय डे” म्हणतात. पण तरीही मद्यपी मंडळींची फारशी गैरसोय होते असे नाही. त्यांनी त्या दिवशीचे नियोजन आधीच करून ठेवलेले असते. ड्राय डे ला कोणाचाही विरोध नाही आणि नसतोच. तथापि यंदाच्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्यदिनी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश मुंबई महापालिकेने काढला आहे आणि तो कसा चुकीचा आहे, आमच्या खाद्य संस्कृतीवर आघात करणारा कसा आहे. याची चर्चा राजकारण्यांनी सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला महाराष्ट्रात”ब्राह्मण्य” हे मागील दाराने आणावयाचे आहे. सर्वसामान्य जनतेने काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? 15 ऑगस्ट हा काही धार्मिक सण नाही, तो विजय उत्सव आहे. त्यादिवशी मांसाहार केल्यामुळे बिघडले कुठे? असा सवाल महाविकास आघाडीतील संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार वगैरे मंडळींनी उपस्थित केला आहे. आणि त्यावरून गेले दोन दिवस राजकारण सुरू आहे.
आपल्याकडे धार्मिक सण तसेच विविध प्रकारचे उत्सव असतात तेव्हा शक्यतो मांसाहार केला जात नाही. गोडधोड जेवण बनवले जाते. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असला तरी तो राष्ट्रीय उत्सव आहे. त्यामुळे त्या दिवशी मांसाहार केला नाही तर फार मोठे संकट कोसळते असे नाही. मुळातच जगभर “शाकाहार” चळवळ सुरू झाली आहे. ह्यूमन बॉडीला मांसाहार मुळातच चालत नाही. पण तरीही मांसाहार हा खाद्य संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे.
महावीर जयंतीला राज्यातील तसेच देशभरातील कत्तलखाने बंद असतात. दिनांक 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी(Independence Day) कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने 1988 मध्ये घेतलेला आहे. आणि म्हणूनच मुंबई महापालिकेसह बहुतांशी महापालिका क्षेत्रात नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत येथील प्रशासनाने स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश काढलेला आहे.
1988 सालच्या निर्णयाप्रमाणे हा आदेश काढला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तो याच वर्षी काढलेला आहे असा समज किंवा गैरसमज करून घेऊन काही मंडळी हे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो आहोत असे सांगून त्यांनी विरोध सुरू केला आहे. बंदी आदेश मोडून आम्ही स्वातंत्र्यदिनी मांसाहारी पंगती उठवू असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी तर महाराष्ट्राला नपुंसक बनवण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विचार असल्याचा आरोप केला आहे.
स्वातंत्र्यदिनी(Independence Day) कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. तो काँग्रेस राजवटीत घेतला गेलेला आहे. अगदी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारचा आदेश काढण्यात आला होता याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून देऊन या निर्णयाशी आमच्या सरकारचा काहीही संबंध नाही असा खुलासा केलेला आहे.
वास्तविक एक दिवस मांसाहार केला नाही म्हणून कोणी नपुंसक होत नाही किंवा त्याच्यावर आभाळ कोसळत नाही. स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय उत्सव आहे आणि उत्सवात गोडधोड खाल्ले जाते. कोल्हापूर अनेक शहरात त्या दिवशी जिलेबी चे स्टॉल चौका चौकात लावले जातात. त्यादिवशी अनेकांच्या कडून मिठाईचे वाटप केले जाते. हा राष्ट्रीय उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये येतो आणि हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात मांसाहार निषिद्ध असतो.

या महिन्यात मांसाहार का केला जाऊ नये या मागे मानवी आरोग्याशी निगडित शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत. त्यामुळे एक दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश काढल्याबद्दल आकांडतांडव करण्याची गरज नाही. एकीकडे जगभरात”शाकाहारी बना”अशी चळवळ सुरू असताना आम्ही मटन चिकन खाणारच आणि तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे अशी भूमिका घेतली जात आहे. पण आता त्यावर राजकारण सुरू आहे , कत्तलखाने बंद च्या आदेशाचे राजकीय भांडवल केले जात आहे.
कुणी काय खावे आणि काय खाऊ नये हा प्रत्येकाला असलेला अधिकार आहे. या अधिकाराचा संकोच कुणालाही करता येत नाही. पण राष्ट्रीय उत्सवाच्या निमित्ताने जुन्याचं निर्णयाने कत्तलखाने बंद करण्याचा आदेश स्थानिक प्रशासनाने काढला असेल तर त्याला विरोध करू नये. आणि त्यावर राजकारण तर मुळीच करू नये.
हेही वाचा :
आनंदाची बातमी आता काही तासांत क्लिअर होणार चेक
तारक मेहता..’मधील दयाबेनच्या लग्नातील फोटो पहिल्यांदाच समोर
आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयीन कार्यालयामध्ये चोरी