दुबई येथे होणाऱ्या पुरुष अंडर-19 आशिया कपसाठी वेळापत्रक जाहीर झाले असून भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी(Cricket) मोठी अपडेट समोर आली आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात बहुप्रतीक्षित सामना रंगणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी यालाही संघात स्थान मिळाले असून त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
आशियाई क्रिकेट(Cricket) परिषदेने 12 ते 21 डिसेंबरदरम्यान दुबई येथे अंडर-19 आशिया कप आयोजित केला आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पात्रता मिळवणारा एक अतिरिक्त संघ सहभागी होणार आहे. या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा होत असलेला सामना म्हणजे भारत व पाकिस्तान यांची 14 डिसेंबरला होणारी ग्रुप स्टेज भिडत.
यंदाच्या U-19 संघात भारताकडून अनेक चमकदार खेळाडूंना संधी मिळाली आहे. विशेषतः वैभव सूर्यवंशीची निवड चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ठरली आहे. हा युवा फलंदाज मागील काही महिन्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून टुर्नामेंटमध्ये भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

भारतीय संघाचे नेतृत्व आयुष म्हात्रे करणार असून त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गाजवलेले शतक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईकडून खेळताना त्याने 59 चेंडूत 110 धावा ठोकत 8 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली होती. त्याच्या या फटक्यांनी सूर्यकुमार यादवसुद्धा थक्क झाल्याची चर्चा झाली होती.
अशा दमदार फॉर्मनंतर आता पाकिस्तानविरुद्ध त्याला मोठी कसोटी द्यावी लागणार आहे. हाय-वोल्टेज वातावरण, प्रचंड दडपण आणि लाखो चाहत्यांच्या नजरा यातून मार्ग काढत भारताला विजय मिळवून देण्याचे आव्हान आयुषपुढे असेल. उपकर्णधार विहान मल्होत्रा, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, हरवंश सिंह आणि इतर खेळाडू त्याला मजबूत सहकार्य देण्यास सज्ज आहेत.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
देशावर मोठं संकट, चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
दरमहा 7,000 रुपयांची बचत करून 57.72 लाख रुपयांचा फंड मिळेल, जाणून घ्या