महाराष्ट्रातील सांगलीमध्ये लग्नाचे(wedding) मुख्य विधी पार पडण्याआधीच स्मृतींचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना छातीत वेदना आणि हृदयाचे त्रासासारखी लक्षणे जाणवल्यामुळे तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

ही परिस्थिती पाहता, दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की अशा वेळी समारंभ पुढे नेणे योग्य नाही. स्मृती आपल्यावरच नव्हे, तर आपल्या वडिलांवरही भावनिकदृष्ट्या अत्यंत अवलंबून आहेत, आणि त्यांच्या प्रकृतीत आलेल्या बिघाडाने दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. सुदैवाने काही दिवसांच्या उपचारानंतर स्मृतींच्या वडिलांची तब्येत सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनाक्रमामुळे पलाश मुच्छल यांच्यावरही मोठा मानसिक तणाव आला. संगीतकाराच्या आई अमिता मुच्छल यांच्या म्हणण्यानुसार, हळदी झाल्यापासून पलाश सतत मानसिक तणावात होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची भीती जाणवत होती. अचानक डॉक्टरांकडे न्यावे लागल्याने कुटुंबाची चिंता वाढली.
त्यांना काही तास रुग्णालयात ठेवून उपचार करण्यात आले, आयव्ही ड्रिप आणि ईसीजी करण्यात आले, आणि नंतर सर्व काही ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पलाशला थोडा वेळ पूर्ण विश्रांती देण्यात आला आणि आता त्यांची तब्येत स्थिर आहे.
विवाह पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे, एडिट केलेले स्क्रीनशॉट आणि अनकन्फर्म्ड चॅट्स व्हायरल झाले. काही पोस्टमध्ये पलाशने स्मृतीला ‘धोका दिला’ असा आरोप करण्यात आला. पण, या दाव्यांना कोणताही अधिकृत आधार नाही. दोन्ही कुटुंबांनी या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे कुटुंबाचे मत आहे.
स्मृती मंधानाने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून लग्नाच्या(wedding) विधीचे काही पोस्ट हटवले, आणि त्यामुळे या अफवा आणखी जोरात उठल्या. पण कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले की हे फक्त तत्कालीन भावनिक निर्णय होते.

पलाश मुच्छल यांच्या आईने संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करताना सांगितले की, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. सजावट, स्वागत समारंभ, पाहुणे सर्व ठरल्याप्रमाणे आयोजित केले होते. स्मृतींच्या वडिलांची तब्येत पाहूनच सोहळा थांबवण्याचा निर्णय घेतला.
“स्मृती आणि पलाश दोघेही फार त्रासातून जात आहेत. पण हे तात्पुरते आहे. लग्न नक्की होईल, आणि तेही लवकर. आम्ही अजूनही स्वागतासाठी सर्व तयारी ठेवली आहे.” त्यांनी हेही सांगितले की पलाशचे स्मृतींच्या वडिलांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आणि त्यांच्या प्रकृतीची चिंता त्याला सर्वात जास्त होती.
आतापर्यंत दोन्ही कुटुंबांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, पलाशच्या आईच्या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, विवाह लवकरच होणार आहे आणि तयारी पुन्हा सुरू होऊ शकते. चाहते आणि दोन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटी या आनंदवार्तेची वाट पाहत आहेत.
हेही वाचा :
राज ठाकरेंना मोठा धक्का, प्रमुख नेत्याच्या राजीनाम्याने मनसेत खळबळ
दरमहा 7,000 रुपयांची बचत करून 57.72 लाख रुपयांचा फंड मिळेल, जाणून घ्या
देशावर मोठं संकट, चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी