क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे जवळचे नाते असल्याचे बोलले जाते.(dating) विराट कोहली-अनुष्का शर्मा, जहीर खान- सागरीका घाटगे आणि इतर काही क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहेत. आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर देखील एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…

मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर एका अभिनेत्रीला डेट करत आहे. श्रेयस एका मराठमोळ्या, अतिशय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे.(dating) सोशल मीडिया, रेडिटवर एका युजरनं श्रेयस अय्यरच्या डेटिंगबद्दल मोठा दावा केला आहे. युजरने म्हटले आहे की, श्रेयस अय्यर गपचूक एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत आहे. तो गुपचूप आपलं प्रकरण पुढे नेतोय.

श्रेयस अय्यरसोबत ज्या अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. (dating)रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, मृणाल आणि श्रेयस गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांचे नाते सध्या प्रायमरी स्टेजला आहे आणि त्यांना ही बाब सध्या खासगीतच ठेवायची आहे असे म्हटले आहे. श्रेयस आणि मृणालच्या अफेअरच्या चर्चा समोर येताच नेटकरी खूश झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचे नाव जोडून एक हॅशटॅग तयार केला आहे #Shreyal. हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रविवारी रात्री मृणाल ठाकुरने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. (dating)या स्टोरीद्वारे मृणालने स्वतःबद्दल पसरलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी मृणालने या अफवांवर थेट कमेंट केली नाही. आईकडून डोक्याला तेल लावून घेत असतानाचा हसत-खेळत एक व्हिडीओ शेअर केला. श्रेयस अय्यरशी जोडल्या जाणाऱ्या अफवांवर टोमणा मारत तिने कॅप्शन लिहिलं, “ते बोलतात, आपण हसतो. अफवा म्हणजे फ्री पीआर आणि मला अशा गोष्टी आवडतात!”

मृणालच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटचे (dating)अजय देवगणचा कॉमेडी चित्रपट ‘सन ऑफ सरदार २’मध्ये दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सिनेमा बजेट इतकेही पैसे कमाऊ शकला नाही. त्यानंतर सध्या मृणालकडे वरुण धवनसोबत ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटातही मृणाल दिसणार आहे.

हेही वाचा :

इतके स्वस्त कुठेच नाही, Jio चे 3 स्वस्त प्लॅन्स, JioHotstar फ्री बघा,

युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स अन्

शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ ४ दिवशी सर्व

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *