महाराष्ट्रात सर्वात मोठी पोलीस भरती(Recruitment) सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच भरतीची शेवटची तारीखदेखील जवळ आली आहे. या पोलीस भरतीचे पात्रता निकष देण्यात आले आहेत. कोणत्या उमेदवारांचे अर्ज बाद होऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात एकूण 15 हजार 631 पदे भरण्यात येणार आहेत. यात पोलीस कॉन्स्टेबलची 12 हजार 399, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची 234, जेल कॉन्स्टेबलची 580, एसआरपीएफ म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स कॉन्स्टेबलची एकूण 2 हजार 393 पदे आणि बँड्समनची 25 पदे भरली जाणार आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठ्या पोलीस भरतींपैकी एक आहे.

महाराष्ट्र पोलीस भरतीची(Recruitment) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क मात्र ३ डिसेंबर 2025 पर्यंत भरता येईल. उशिरा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, म्हणून तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांचे किमान वय 18 आणि कमाल वय 28 वर्षे असावे. आरक्षित उमेदवारांना वयात सवलत लागू आहे. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात व शुल्कात सूट आहे.

सामान्य/ओपन प्रवर्गातील उमेदवारांकडून 450 रुपये, SC/ST/माजी सैनिक इ. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 350 रुपये शुल्क घेतले जाईल. ही रक्कम उमेदवारांना ऑनलाइन डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI पद्धतीने भरता येईल.

पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट: mahapolice.gov.in किंवा policerecruitment2025.mahait.org वर जा. होमपेजवर “Apply Online” वर क्लिक करा . मोबाईल नंबर व ईमेल आयडीने नोंदणी करा.लॉगिन करून अर्ज भरा, फोटो-सही अपलोड करा.शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट घ्या.

दिलेल्या मुदतीनंतर केलेले अर्ज बाद करण्यात येतील. अर्जामध्ये खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईदेखील होऊ शकते, याची उमेदवारांनी नोंद घ्या. अर्जात त्रुटी आढळल्यास तो बाद होऊ शकतो.

हेही वाचा :

स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय? 

राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!

क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *