फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी.(Oil)इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्ही १२वी पास आणि आयटीआय, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर ही उत्तम संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.इंडियन ऑइलमध्ये २७०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.

इंडियन ऑइलमधील ही भरती ९ रिफाइनरी युनिटमध्ये होणार आहे.(Oil) या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमची निवड थेट मेरिट बेसिसवर होणार आहे.इंडियन ऑइलमध्ये २७५६ पदांसाठी भरती केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२५ आहे.१८ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचे आहेत. तुम्हाला iocl.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.अप्रेंटिस पदासाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी (मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रीयल केमिस्ट्री) मध्ये ३ वर्षांचा बी.एससी केलेली असावी. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावे. ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे.

सर्वात आधी तुम्हाला iocl.com वेबसाइटवर जायचे आहे.(Oil)यानंतर करिअर सेक्शनवरी अप्रेंटिसशिपवर जायचे आहे.यानंतर तुम्हाला Click Here to Register/Apply on NATS/NAPS Portal NATS, NAPS वर क्लिक करायचे आहे.यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचे आहे तिथे फॉर्म भरायचा आहे.तुमची सर्व माहिती भरा. शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर फोटो आणि सही अपलोड करावीत.यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

हेही वाचा :

इतके स्वस्त कुठेच नाही, Jio चे 3 स्वस्त प्लॅन्स, JioHotstar फ्री बघा,

युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स अन्

शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ ४ दिवशी सर्व

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *