तुम्ही जिओचे युजर्स असाल आणि तुम्हाला जिओहॉटस्टार फ्री बघायचे(cheapest) असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला जिओचे असे काही खास प्लॅन्स सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अनेक फायदे कमी पैशात मिळू शकतात. चला तर मग अशा प्लॅन्सची माहिती जाणून घेऊया.जिओ ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचा पोर्टफोलिओ खूप मोठा आहे. यात वेगवेगळ्या श्रेणी आणि सेवांसह रिचार्ज प्लॅन आहेत. या तीन प्रीपेड प्लॅनपैकी एक अशी आहे की यात हाय-स्पीड डेटासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि SMS मिळत आहे. याशिवाय प्रीपेड पॅकमध्ये जिओ हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे, जे भरपूर मनोरंजन प्रदान करेल.

चला तर मग जाणून घेऊया जिओच्या प्लॅन्सची संपूर्ण डिटेल्स.(cheapest)चला तर मग आता जिओचे रिचार्ज प्लॅन्स नेमके कोणते आहेत, फायदे काय आहेत, याची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.टेलिकॉम कंपनी जिओ आपल्या युजर्संना या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 GB डेटा देत आहे. या पॅकमध्ये 100 SMS मिळतात. तसेच इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. यामध्ये जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन देखील तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या पॅकची वैधता 84 दिवसांची आहे. हे अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज केले जाऊ शकते.

जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा दिला जात आहे. (cheapest)यामध्ये इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी फ्री कॉलिंग दिली जात आहे. यात 100 SMS मिळत आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टारचा अॅक्सेस देखील मोफत दिला जात आहे. यात गुगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन मिळत आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.हा रिचार्ज प्लॅन खास OTT प्रेमींसाठी आणला गेला आहे. या पॅकमध्ये जिओ हॉटस्टारसह Zee5, सोनी लिव्ह, डिस्कव्हरी+ आणि चौपल सारखे अॅप्स मोफत दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा आणि फ्री कॉलिंग मिळते. इतकेच नाही तर दररोज 100 SMS देखील दिले जात आहेत.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार