राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.(schools)महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक कामकाजावर थेट परिणाम करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक संघटना शासनाशी विविध मागण्यांबाबत चर्चा करत आहेत. मात्र, ठोस तोडगा न निघाल्याने अखेर शिक्षक संघटनांनी 5 डिसेंबरला राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्या दिवशी शाळांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या. त्यामध्ये 20 वर्षांपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी सक्ती रद्द करणे ही प्रमुख मागणी आहे.(schools) तसेच शासनाने जारी केलेला 2024 मधील संच मान्यतेचा निर्णय मागे घेण्याचा आग्रहही संघटनांकडून करण्यात आला आहे. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे शाळेतील गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचाही मुद्दा पुढे करण्यात आला आहे. याशिवाय, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती सुरू करणे, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण पुनर्विचारात घेणे अशा मुद्द्यांवर शिक्षक संघटना एकत्रितपणे भूमिका मांडत आहेत. राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकाच दिवशी संपावर जाणार असल्याने शाळा सुरू ठेवणे कठीण होणार आहे.

या राज्यव्यापी आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक आणि (schools)उच्च माध्यमिक अशा सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश आहे. सरकारी, अनुदानित तसेच खासगी शाळादेखील या संपामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढणार असल्याने त्या दिवशी शाळांमध्ये कर्मचारी उपस्थिती अत्यल्प राहणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालकांनी 5 डिसेंबर रोजी शाळेत पाठवण्यापूर्वी आपल्या स्थानिक शाळेच्या प्रशासनाकडून खात्री करून घ्यावी. काही शाळा नोटीसद्वारे किंवा संदेशांद्वारे पालकांना स्वतंत्रपणे माहिती देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास