गौरी पालवे गर्जे मृत्यू प्रकरणात नवे खुलासे समोर येत असून(girlfriend)तपास आणखी गंभीर वळण घेताना दिसत आहे. राज्यभराला हादरवणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी आता अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे. यामुळे कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांना नवा संदर्भ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची काल २ डिसेंबर कोर्टात सुनावणी झाली असून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला. डॉ. गौरी पालवे यांनी वरळीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी नोंदवला होता. मात्र कुटुंबीयांनी ‘ही आत्महत्या नसून हत्या असू शकते’ असा गंभीर आरोप केल्याने तपासाची दिशा बदलली. पती अनंत गर्जेचे इतर महिलांसोबत संबंध असल्याचा गौरीच्या कुटुंबीयांचा आरोप असून याच पाश्वभूमीवर अनंत आणि त्याच्या कुटुंबाला जबाबदार धरण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना (girlfriend)वरळी पोलिसांनी एफआयरमध्ये नमूद असलेल्या अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब घेतला आहे. तिने पोलिसांना सांगितले की, “2022 पासून माझा आणि अनंत गर्जेचा कोणताही संबंध नाही.” तसेच गौरीला घरात सापडलेल्या कागदपत्रांबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही तिने स्पष्ट केले. हा जबाब तपासासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कोर्टात पोलिसांनी सांगितले की, या महिलेसोबत अनंतचे पूर्वीचे संबंध असल्याने तिची चौकशी आवश्यक होती. तिने दिलेला जबाब गौरीला माहित असलेल्या कागदपत्रांशी जुळतो का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. या घटनेने अनंतच्या खासगी आयुष्यातील नवे पैलू समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिसांनी कोर्टात मांडलेल्या माहितीप्रमाणे, (girlfriend)अनंत गर्जेच्या शरीरावर तब्बल 28 ताज्या जखमा आढळल्या आहेत. या जखमा अनंत आणि गौरी यांच्यात झालेल्या झटापटीचे परिणाम असल्याचे पोलिसांचे मत आहे. यामुळे गौरीच्या मृत्यूआधी घरात काहीतरी गंभीर घडल्याचा संशय अधिक दृढ झाला आहे.त्याशिवाय, गौरीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर अनंतने आपलं डोकं भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले आहे. तसेच अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. यासाठी खिडकीला जाळी बसवणाऱ्या व्यक्तीला जाळी उघडून आत प्रवेश करण्‍याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगण्यात आले आहे. पुढील तपासासाठी अनंतची पॉलिग्राफ टेस्ट आणि मानसशास्त्रीय तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू

केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी

हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *