राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उत्साह आहे.(money)पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मतदान देखील पार पडले आहे मात्र निकाल लांबणीवर पडला. न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र मतदान करताना देखील मतदान केंद्रावर अनेक प्रकार झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणी घोषणा, वाद झाले तर पुण्यामध्ये चक्क ईव्हीएम मशीनची पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि २ झालेल्या(money) मतदान प्रक्रियेच्या सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्र कक्षाची महिला उमेदवारांनी पूजाअर्चा केल्याचे समोर आले. मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत थेट ईव्हीएम मशीनची पूजा करून आचारसंहितेचा भंग व परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी वडगाव मावळमधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
भाजपच्या उमेदवार ॲड मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष नवनाथ दळवी व भागवत झांबरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील २४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

यापैकी रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या (money)प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ८ या दोन मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केंद्राध्यक्ष दळवी व भागवत यांनी मज्जाव केला असताना मृणाल म्हाळसकर, अबोली ढोरे व मयुर ढोरे यांनी दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रातील मतदान कक्षाची पूजाअर्चा केली.त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम-२२१, २२३, १७१ ब सह लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३०, १३१, १३२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम व पोलिस उपनिरीक्षक उमेश जाधवराव हे करत आहेत.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास