पुण्यातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.(company)उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीला शीतल तेजवानी यांनी बेकायदेशीरपणे जमीन विक्री केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी अखेर शीतल तेजवानी यांना अटक केली आहे.

पुण्याच्या कोंढवाच्या कोरोगाव आयटी पार्क येथील जमीन(company) पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती. संबंधित जमिनीच्या पॉवर ऑफ अॅटर्नी शीतल तेजवानी या होत्या. त्यांनी पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर करुन शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या नावावर केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं.

शीतल तेजवानी यांच्याकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करुनही (company)ओरिजनल कागदपत्रे सादर केले जात नव्हते. त्यामुळे शीतल तेजवाने यांनी शासनाची फसवणूक केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाल्याचं बोललं जात आहे. शीतल तेजवानी यांनी खोट्या कागदपत्रांचा वापर करुन पॉवर ऑफ अटर्नी बनवण्यात आली. त्यातून जमिनीची विक्री करण्यात आली. या प्रकरणात शीतल तेजवानी यांची दोन वेळा चौकशी झाली. त्यापैकी एकेदिवशी साडेचार तास कसून चौकशी झाली होती.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास