वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आज १५ ऑगस्टपासून फास्टॅगचा(Fastag)वार्षिक पास सुरु होणार आहे. या पासमुळे वाहनधारकांना वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. वर्षभर किंवा २०० ट्रीपपर्यंत तुम्ही मोफत प्रवास करु शकतात. या नवीन फास्टॅग पासमुळे लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे. वाहनचालकांचे पैसेदेखील वाचणार आहे. याचसोबत टोल प्लाझावर होणारी गर्दी टाळता येणार आहे. दरम्यान, या पाससाठी तुम्हाला कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे याबाबत सर्व माहिती जाणून घ्या.

फास्टॅग पास तुम्हाला ऑनलाइन अॅपवरुन काढता येणार आहे. राजमार्ग यात्रा ॲप किंवा NHAI/MoRTH च्या वेबसाइटवर किंवा अॅपवर जाऊन तुम्ही पास काढू शकतात. (Fastag)यासाठी तुम्हाला वाहनाचा नंबर आणि फास्टॅग आयडी टाकून लॉग इन करायचं आहे. यानंतर ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे ३००० रुपये भरायचे आहे. यानंतर तुमचा हा पास सध्याच्या फास्टॅगसोबत लिंक होणार आहे. त्यानंतर तुम्हाला फास्टॅग पास अॅक्टिव्हेशनचा मेसेज येईल.

हा नवीन फास्टॅग पास NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर लागू असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर तुम्हाला या पासचा उपयोग करता येणार आहे. (Fastag)मुंबई-रत्नागिरी, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे, मुंबई-नाशिक, मुंबई-सुरत या महामार्गांवर हा पास लागू होणार आहे.राज्य किंवा महापालिकेच्या टोल प्लाझावर हा पास चालणार नाही. इथे तुम्हाला पैसे किंवा फास्टॅग रिचार्ज असलेला पास दाखवावा लागेल.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल