देशात बहुतांश जणांकडे बॅंक खाते आहे. आपल्या मेहनतीचे पैसे साठवण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी बॅंक खात्याचा आपल्याला उपयोग होतो. ग्राहकांच्या हितासाठी आरबीआय बॅंकांच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल करत असते. याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
बँक खात्यामध्ये किमान शिल्लक, डिजिटल पेमेंट्स आणि बँकिंग चार्जेस अशा बॅंकांच्या नियमांमुळे ग्राहकांना अडचणी येतात. यासंदर्भात RBI ने एक मोठा निर्णय घेतलाय. रिजर्व बँक बीएसबीडी यानी बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट या नियमांमध्ये बदलाची घोषणा केली आहे. आता BSBD ची एक सामान्य बँकिंग सेवा मानली जाईल आणि ती ग्राहक झिरो बॅलन्सवर उघडू शकतील. बँक अकाऊंटमधील पैसे आणि किमान सरासरी शिल्लक (MAB) यासंदर्भात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
आता कोणत्याही बँकेत बेसिक्स सेव्हिंग बॅंक डिपॉझिट (Basic Savings Bank Deposit Account, BSBD) पूर्णपणे शून्य बॅलन्सवर चालेल. मिनिमम अॅवरेज बॅलन्स (MAB) ठेवण्याची सक्ती पूर्ण बंद करण्यात आली आहे. बॅलन्स शून्य झाला तरी दंड किंवा खाते बंद होणार नाही. हा नियम सर्व बँकांना आणि सर्व ग्राहकांना लागू असेल, असे आरबीआयने स्पष्ट केलंय.
मोफत काय?
डेबिट कार्ड, चेकबुक आणि डिजिटल पेमेंट पूर्ण मोफत ATM/डेबिट कार्ड मोफत मिळेल. यासाठी कोणतेही वार्षिक शुल्क नाही. वर्षाला 25 चेक पाने मोफत UPI, NEFT, RTGS, IMPS, इंटरनेट-मोबाईल बँकिंग सर्व मोफत असून कोणतेही हिडन चार्जेस नसतील, असे आरबीआयने स्पष्ट केलंय.
किती ट्रान्झाक्शन फ्री
महिन्याला एकूण 4 वेळा ATM किंवा बँक शाखेतून मोफत पैसे काढता येतील. त्यानंतर सामान्य शुल्क लागेल. मात्र डिजिटल पेमेंट म्हणजे UPI कितीही करा, ते या 4 मर्यादेत मोजले जाणार नाहीत.
जुने सेव्हिंग अकाऊंट
तुमचे सध्याचे सामान्य सेव्हिंग खाते तुम्ही BSBD मध्ये 7 दिवसांत मोफत बदलू शकता. जुन्या BSBD खातेधारकांना देखील नव्या सर्व सुविधा लगेच मिळतील. बँकांना त्या देणे बंधनकारक असल्याचे आरबीआयने स्पष्ट केलंय.
एका व्यक्तीला फक्त एकच BSBD खाते
खाते उघडताना स्व-घोषणापत्र द्यावे लागेल. खाते उघडण्यासाठी एक पैसाही लागणार नाही (₹0 इनिशियल डिपॉझिट). पूर्ण KYC बंधनकारक आहे. डेबिट कार्ड किंवा चेकबुक फक्त ग्राहक मागेल तेव्हाच दिले जाणार आहे. यासाठी कोणतीही जबरदस्ती नसेल. आता BSBD हे भारतातील सर्वात सोपे, स्वस्त आणि पूर्ण सुविधा असलेले झिरो बॅलन्स खाते बनले आहे. गरिब-श्रीमंत अशा कोणत्याही व्यक्तीला हे खाते उघडता येईल आणि बँकिंग आता खूपच स्वस्त व सोयीस्कर होणार असल्याचे चित्र दिसतंय.