अभिनेता आमिर खानने त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त गौरी स्प्रॅटसोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला. तेव्हापासून सतत त्याच्याबद्दल आणि गौरीबद्दल चर्चा रंगत होती. आमिर खान याचं दोनदा लग्न झालं परंतु त्याने दोन्हीही लग्न मोडली. आता आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिसऱ्यांदा प्रेमात पडल्यानंतर त्याने स्वत: ला नशीबवान असल्याचं म्हटलय.
हिंदुस्तान लीडरशिप समिट 2025 मध्ये बोलताना आमिर खान म्हणाला की, ‘मी कधीच विचार केला नव्हता की, मी पुन्हा रिलेशनशिपमध्ये येईल. गौरी माझ्या आयुष्यात आहे, त्यामुळे मी खुप नशिबवान आहे. ती खूप शांत आणि संयमी आहे. खरंच गौरी एक अप्रतिम व्यक्ती आहे. ती भेटणं हे माझं खरंच भाग्य आहे. रीना, किरण आणि गौरी या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी खुप आनंदी आहे. या तिघींचं माझ्या आयुष्यात खुप मोठं योगदान आहे.’
पुढे बोलताना आमिर खान म्हणाला की, ‘या तिन्ही महिलांनी माझं आयुष्य चांगलं बनवलं. माझं व्यक्तीमत्त्व सुधारण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मी माझ्या आयुष्यात आलेल्या तीन ही महिलांचा खूप आदर करतो. या व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं हे खरंच खुप भाग्याचं आहे.’
दरम्यान आमिर खानबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो गौरीसोबत रिलेशनशीप आहे. गौरी ही बंगळुरूची असून तिला एक ६ वर्षीय मुलगी सुद्धा आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमिर आणि गौरी रिलेशनशीपमध्ये आहेत. आमिरचं पहिलं लग्न 1986 साली रीना दत्तासोबत झालं होतं. 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने किरणसोबत लग्न केलं. परंतु गेल्यावर्षी त्यांनी घटस्फोट घेतला.