दहावी, बारावी परीक्षेसाठी आता परीक्षा अर्ज परीक्षेच्या २० दिवस आधीच स्विकारणे (application)बंद करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. बारावीसाठी २१ जानेवारी तर दहावीसाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. परीक्षेच्या तोंडावर राज्य मंडळाचा निर्णय चर्चेचा ठरला आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी, बारावी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच राज्य मंडळाने परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा कालावधी निश्चित केला आहे. मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्काने अर्ज स्विकारण्याच्या तारखा व शुल्कांचा तपशील जाहीर केला आहे.

परीक्षेसाठी अर्ज लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत स्विकारण्यात येत होते. (application)आता अर्ज भरण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे. परीक्षेच्या २० दिवस आधीपर्यंतच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.दहावीसाठी अतिविलंबाने शुल्क भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत ३० जानेवारीपर्यंत असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. ३० जानेवारीपर्यंत दहावीचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तर बारावीसाठी २१ जानेवारीपर्यंत अर्ज स्विकारण्यात यावीत, असे राज्य मंडळ सचिवांनी विभागीय सचिवांना कळविले आहे. बारावीचे अतिविलंब शुल्क, विशेष अतिविलंब शुल्कासह अतिविशेष अतिविलंब शुल्क दिवसागणिक कसे असेल याचा तक्ता देण्यात आला आहे.

परीक्षा काही दिवसांवर राज्यभरातील विविध विभागीय मंडळाकडून याबाबतची मागणी होती, (application)असे अधिकारी सूत्रांनी सांगितले. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज स्विकारण्यात येत होते. त्यामुळे शेवटपर्यंत कोणत्या केंद्रावर किती विद्यार्थी प्रविष्ठ झाले हे निश्चित करणे अडचणीचे ठरत होते. परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी ठराविक दिवसापर्यंतच असेल तर प्रविष्ठ विद्यार्थी निश्चित करणे सोयीचे ठरेल, यामुळे विभागीय मंडळाच्या काही अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची मागणी पुढे आली होती, असे सुत्रांनी सांगितले.पूर्वी आपण शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा आवेदन पत्रे भरून घेत होतो. आता २० दिवस अगोदर अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे. शिवाय तारखा निहाय किती शुल्क द्यावे लागणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा

ठाकरे गटात मोठा भूकंप?

‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशाराEditEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *