महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. (postpones)महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 डिसेंबर 2025 रोजी होणारी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायती निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख याच दिवशी येत असल्याने हा निर्णय अपरिहार्य ठरल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रे आणि मतमोजणी केंद्रे एकाच परिसरात असल्याने सुरक्षा, वाहतूक आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता यांसारख्या समस्यांची शक्यता वर्तवण्यात आली होती.आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अहवालांच्या आधारे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने लाऊडस्पीकरचा आवाज, मतमोजणीदरम्यानची गर्दी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, वाहतूक कोंडी आणि मनुष्यबळाची कमतरता अशा विविध अडचणींचा उल्लेख यामध्ये केला आहे. या सर्व मुद्द्यांमुळे परीक्षेचे नियोजन सुरळीत होऊ शकत नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत परीक्षा आयोजित करण्यात आली होती. (postponesमात्र, राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार याच दिवशी नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी ठेवल्यास व्यवस्थापनात मोठा ताण निर्माण होईल, अशी भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.तसेच काही जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे आणि मतमोजणी केंद्रे अत्यंत जवळ असल्याने आवाज, गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था यांचा परीक्षेच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो, अशी स्पष्ट माहिती प्रशासनाने MPSC कडे पाठवली. याशिवाय, परीक्षेसाठी लागणारे कर्मचारी मतमोजणी कामात गुंतल्याने मनुष्यबळाची कमतरता निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. या सर्व कारणांचा विचार करून आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

MPSC ने परिपत्रक जारी करून नव्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे.(postpones त्यानुसार, महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आता 4 जानेवारी 2026 रोजी घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेचा वेळ आणि केंद्र संबंधित माहिती पूर्वीप्रमाणेच राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले.आयोगाने उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरील शुद्धीपत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेची तयारी करत असलेल्या लाखो उमेदवारांसाठी जरी तारीख बदल ही अनपेक्षित बाब असली, तरी प्रशासनिक कारणांसाठी हा निर्णय गरजेचा होता अशी भूमिका MPSC ने मांडली आहे. दरम्यान, या नव्या तारखांमुळे उमेदवारांना तयारीसाठी आणखी काही दिवस मिळणार असल्याने अनेकांनी हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा

ठाकरे गटात मोठा भूकंप?

‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *