चांगल्या कंपनीत नोकरी करायची अनेकांची इच्छा असते.(company) तुम्हीही जर नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारची कंपनी बीएसएनएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत संचार निगम लिमिटेडमध्ये काम करु शकणार आहात. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बीएसएनएलमध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी फ्रेशर्सदेखील अर्ज करु शकतात. तुम्हाला अधिकृत वेबसाइट bsnl.co.in जाऊन अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. (company)या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च आहे. फॉर्ममध्ये काही बदल करायचे असतील तर त्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. या नोकरीसाठी १२० पदे भरती केली जाणार आहे.बीएसएनएलमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा २९ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड मल्टीपल चॉइस ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्नांची असणार आहे. यानंतर मेरिट लिस्ट आणि कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,९०० ते ५०,५०० रुपये पगार मिळणार आहे.

बीएसएनएलमधील या नोकरीसाठी अर्ज करताना पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.(company) टेलिकॉमन ऑपरेशन्स पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन में बॅचलर ऑफ इंजीनियरिंग/बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी पदवी प्राप्त केलेली असावी. तर फायनान्समधील पदांसाठी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटसी पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *