आगामी महापालिका निवडणुकीवर पुन्हा वादळ घोंगावत आहे.(postponed)महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. मतदार याद्यांचा घोळ अजून निस्तारलेला नाही. मुंबईतच लाखो दुबार मतदार सापडले असून मतदार याद्यांची शुद्धी झालेली नाही. अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर होती. त्यानंतर निवडणूक पुढील आठवड्यात घोषीत होण्याची शक्यता होती. पण अजून निवडणूक याद्यांचा घोळच निस्तारलेला नसल्याने आणि मतदार यादी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्यात देण्यात आल्याने महापालिका निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.(postponed) राज्य निवडणूक आयोगाने अखेरच्या टप्प्यात याविषयीचा आदेश दिला. मतदार याद्या जाहीर करण्यास उशीर होत असल्याने आणि त्यावर पुन्हा आक्षेप आणि हरकती आल्यास महापालिका निवडणूक कार्यक्रमात व्यत्यय येण्याची आणि महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकांच्या मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी (postponed)मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे. जर त्यानंतर राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतल्यास अथवा काही उमेदवार या मतदार याद्यांमधील घोळाप्रकरणी न्यायालयात गेल्यास संभावित वेळापत्रक सुद्धा बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिका निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकातील बदलामुळे असा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे (postponed)निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहे. दोन महापालिका आणि काही जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलंडण्यात आली होती. त्यात नागपूर आणि चंद्रपूर महापालिका आणि जिल्हा परिषदांचा समावेश होता. 50 टक्के आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे आणि या महापालिकांचा निवडणूक निकाल त्या आरक्षण याचिकांच्या निकालाशीअधीन असेल असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हा सर्व घोळ निस्तारण्यासाठी वेळ लागू शकतो. परिणामी डिसेंबर अखेर जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता माळवली आहे. या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक

जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची

मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *