इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची (sharing)भाऊगर्दी होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांत तब्बल ४२५ हून अधिक उमेदवारी मागणी अर्ज वितरीत केले आहेत.तर सुमारे ३२५ हून अधिक आजअखेर भाजप कार्यालयाकडे जमा झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींचा कस लागण्याची चिन्हे आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व उमेदवारी अर्जांची प्रभागनिहाय छाननी केली जाणार आहे.त्यानंतर सर्व अर्ज भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत. उमेदवारी अर्जानुसार पक्षांची एक टीम शहरात येऊन सर्व्हे करणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर समितीकडून उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवस भाजप कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व जमा (sharing)करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इचलकरंजी दौऱ्यानंतर भाजपमधील हालचालींनी प्रचंड वेग घेतल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवारी देताना नव्या – जुन्यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते उमेदवारी मागण्यासाठी सक्रिय झाले आहेत. उमेदवारी अर्ज घेण्यासह जमा करण्यासाठी आज भाजप कार्यालयात दिवसभर वर्दळ राहिली.
इचलकरंजी महापालिकेसाठी ६५ जागा आहेत. (sharing)त्यातील काही जागा घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी असणाऱ्या जागांसाठी इच्छुकांची गर्दी होत आहे. त्यामुळे उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता तपासली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रभागनिहाय उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे; पण काही इच्छुकांनी उमेदवारीसाठीचे प्रबळ दावेदार आपणच असल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केली आहे.

उमेदवारी मागणी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता;(sharing) पण इच्छुकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे उद्या ता. ९ पर्यंत उमेदवारी अर्ज घेण्यासह वेळेत जमा करता येणार आहेत. याबाबतची माहिती पक्षाकडून देण्यात आली.भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे बंडखोरीची भीती वाढत आहे. चार सदस्यीय प्रभागात भाजपकडून तब्बल दहा ते बारा जण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास काहीजण मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेण्याची तयारी दर्शवली आहे, तर काहीजण अपक्ष निवडणुकीत रिंगणात उतरण्याच्या मानसिकतेत आहेत.
हेही वाचा :
झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा
‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशाराEditEdit