गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय कडून सातत्याने(radar)विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. आज पहाटे ईडीने बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल १०८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे बोललं जात आहे.

ईडीच्या पथकाने पुण्यातील २ आणि बारामतीत ३ ठिकाणी छापेमारी केली आहे.(radar) यात जळोची खताळ पट्टा आणि झारगडवाडी या ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. आनंद लोखंडे आणि त्याच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. आनंद लोखंडेवर ३५० कोटींच्या अपहाराचे आरोप आहेत. आनंद लोखंडे याच्यावर विविध ठिकाणी मिळून ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे विजय सुभाष सावंत यांनी (radar)वाघोली पोलीस ठाण्यात ७ ऑक्टोबर रोजी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात आनंद सतीश लोखंडे, त्याचे वडील सतीश बापुराव लोखंडे, विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोखंडे याने वेगवेगळ्या फार्म्सच्या माध्यमातून लोकांकडून गुंतवणूक गोळा करत त्यांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर पतसंस्थांचे कर्ज काढून त्यामध्येही मोठा घोटाळा केल्याप्रकरणी गंभीर तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

आनंद लोखंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा(radar) अत्यंत जवळचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. लोखंडे याने रोहित पवारांच्या विधानसभा मतदारसंघात शाळा बांधणे, विद्यार्थ्यांना गणवेश वाटणे अशा विविध सामाजिक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहितीही समोर येत आहे. आता ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता