नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व पक्षांनी (workers)आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मित्रपक्षच आपले पदाधिकारी, उमेदवार फोडत असल्याने शिवसेना आणि भाजपात वाद निर्माण झाला होता. यानंतर दोन्ही पक्षांनी सहमतीने एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय घेतला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार फुटू नयेत यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ(workers)शिंदेंनी नवा प्लान आखला आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस प्रत्यक्ष विभागातील आमदारांच्या घेणार ते भेटीगाठी घेणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे स्वतः जातीने लक्ष आहेत. कार्यकर्ते फुटू नये, कार्यकर्त्यांची कामे वेळेत व्हावी यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांचा मानस आहे.
सर्व पक्षांनी पुढील निवडणुकांसाठी राजकीय गणितं मांडायला सुरुवात केली आहे.(workers) त्यादृष्टीने जागावाटप, मतदारसंघ यासंदर्भात चर्चाही सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंनीही आता पालिका निवडणुकीकडे लक्ष वळवलं असून भाजपाकडे 125 जागांसाठी प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंची महापालिकेत 125 जागेसाठी आग्रही आहे. लवकरच शिवसेना भाजपासमोर 125 जागेचा प्रस्ताव ठेवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या(workers) पार्श्वभूमीवर पक्षातील तीन आमदाांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. पश्चिम उपनगरात पालिकेच्या या जागांवर मुंबईचा महापौर बसतो. त्यामुळेच शिंदेंनी पश्चिम उपनगरातल्या या तीन आमदारांवर पश्चिम उपनगराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीतील आमदार मुरजीकाका पटेल आणि कुर्ल्यातील आमदार दिलीप मामा लांडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळत आहे. या तिघांवर 12 ते 15 जागांची जबाबदारी सोपवण्यात आली असून याच प्रकारे मुंबईतही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड झालेल्या (workers)चर्चेनंतर शिवसेनेच्या बैठकीत नाराजीचा सूर उमटला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या देवगिरीवरील बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा उल्लेख करत शिवसेना आमदारांनी नाराजी जाहीर केली. शिवसेना पक्षश्रेष्ठीवरील टीका आम्ही मान्य करून घेणार नाही असा काही मंत्री आणि आमदारांचा सूर आहे. शिवसेनेचे मंत्री आणि आमदार प्रामुख्याने नाराज आहेत. भाजपकडून सत्तेचा वापर करत कार्यकर्ते फोडण्याचे काम आतल्या आत सुरू असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंकडे करण्यात आली.
सिंधुदुर्ग, मालवण, रायगड, जळगाव, अंबरनाथ, नवी मुंबई, कल्याण, (workers)डोंबिवली, पालघर इथे अजूनही ऑपरेशन लोटस सुरूच असल्याची आमदारांची तक्रार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आमदारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात आपली नाराजी याआधी जाहीर केली होती. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार आणि पदाधिकारी फोडत असल्याने नाराज नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणं टाळलं होतं. तसंच राज्यात ऑपरेशन लोटस सुरु असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंकडे केली होती. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते यांना प्रवेश द्यायचा नाही आणि महायुतीचा धर्म पाळायचा असा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही ही नाराजी कायम असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता