लाडकी बहीण योजनेवरुन सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे.(Applications)दरम्यान, लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीदेखील सुरु झाले आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरु आहे. या योजनेतून तब्बल ३०,००० महिलांना बाद करण्यात आले आहे. बुलढाण्यातली महिलांचे अर्ज बाद केले आहेत.बुलढाणा जिल्ह्यात आज एकूण 6 लाख 40 हजार 879 महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, या महिलांची तपासणी करण्यात आली. विविध कारणांमुळे 30 हजार 304 महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे. तर 390 महिलांनी आपला लाभ बंद करण्यासाठी विनंती केली होती.

त्यामुळे त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. (Applications)सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी ईकेवायसी करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येत आहे.लाडकी बहीण योजनेतील विविध जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. यातील अनेक महिला या निकषांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे त्यांचे लाभ बंद केले आहेत. आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. याचसोबत महिलांची केवायसी प्रोसेस सुरु आहे. यातून फक्त पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल.

लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. (Applications)लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला रजिस्ट्रेशनवेळी २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज आले होते. यापैकी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज स्विकारण्यात आले होते. यातील अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यात अनेक शासकीय कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक

जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची

मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *