महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांना वाईन शॉप आणि किरकोळ(wine)देशी मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला असून, यापुढे अशा दुकानांसाठी सोसायटीची ‘ना हरकत’ बंधनकारक असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. किरकोळ विदेशी व देशी मद्यविक्री दुकाने स्थलांतरित करताना देखील नोंदणीकृत सोसायटीची परवानगी घेणे आवश्यक राहील. हा निर्णय संपूर्ण राज्यात एकसमानपणे लागू करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी–रहाटणी परिसरातील(wine) नियमबाह्य दारू दुकानांबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. पिंपरी-चिंचवडमधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉपचे परवाने निलंबित करण्यात आले असून, त्यातील एका दुकानाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनअधिकारी दारूपार्टी करत (wine)असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संरक्षण चौकी परिसरात काही अधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ कोणाकडून रेकॉर्ड झाला आणि कसा प्रसारित झाला, याचाही तपास करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

नववर्ष स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन(wine) दलाने 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवण्याचे ठरवले आहे. या कालावधीत शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि बारची तपासणी केली जाईल. आग प्रतिबंधक उपाययोजना अपुऱ्या आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता