बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित दृश्यम ३ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक (director)आतुरतेने वाट पाहत आहेत. तीन वर्षांपूर्वी दृश्यम २ प्रदर्शित झाला होता. दृश्यम आणि दृश्यम २ या दोन्ही चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट फक्त अभिनेता मोहनलालच्या कारकिर्दीतीलच नाही तर, अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. सस्पेन्स आणि थ्रिलरने पुरेपूर या चित्रपटाचा तीसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अजय देवगणचा दृश्यम हा मोहनलाल अभिनीत मल्याळम चित्रपट दृश्यमचा रिमेक आहे.(director) मोहनलालचा दृश्यम हा चित्रपट आधीच दोन भागात प्रदर्शित झाला होता. अजय देवगण यांचा दृश्यम देखील दोन भागात प्रदर्शित झाला होता. दरम्यन, पाच महिन्यांपूर्वी दृश्यम ३ चे शूटिंग स्वतंत्रपणे सुरू झाले होते. आता लवकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.

दृश्यम ३ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाबाबत दिग्दर्शकाने एक मोठी अपडेट दिली आहे.(director) दृश्यम ३ हिंदी आणि मल्याळम भाषेतील दोन्ही वर्जन पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. अजय देवगण अभिनीत हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झाले नाही. मात्र, मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे.मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चे दिग्दर्शक जीतू जोसेफ म्हणतात, ‘हा चित्रपट सध्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट हिंदी वर्जनच्या पूर्वी रिलीज होईल’.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit