सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता कितीने(employees)वाढणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. सातवं वेतन आयोग अंतिम टप्प्यात असताना नव्या वेतन आयोगासाठी सरकारने टर्म्स ऑफ रेफरन्स जारी केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षातील पगार रचनेबाबत चर्चा पुन्हा वेग घेत आहे. त्यामुळे आता वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे लक्ष DA वाढीकडे लागले आहे.

सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येणार असताना, (employees)जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्याचा महागाई भत्ता वाढवण्याची प्रचलित पद्धत आहे. जुलै 2025 मध्ये झालेल्या वाढीनंतर आता नव्या हप्त्याची उत्सुकता वाढली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार, महागाई भत्ता 58% वरून 60% पर्यंत म्हणजेच केवळ 2% वाढणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. ही वाढ मागील सात वर्षांतील सर्वात कमी ठरू शकते, अशी नोंद समोर आली आहे.
जानेवारी 2025 मध्येही DA मध्ये फक्त 2% वाढ देण्यात आली होती. त्यामुळे आगामी वाढही याच मर्यादेत राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांचा पगार काही प्रमाणात वाढेल, परंतु सध्याच्या वाढत्या खर्चाच्या काळात ही वाढ अपुरी असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ संपत असतानाच कर्मचाऱ्यांना जास्त वाढीची अपेक्षा होती, मात्र अंदाजित वाढ त्यापेक्षा कमी आहे.
सातवा वेतन आयोग पूर्ण करत असताना आठवा वेतन(employees) आयोगही औपचारिकरित्या तयार झाला आहे. मात्र त्याच्या ToR मधील अंमलबजावणीची अचूक तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर मंजुरी आणि अंमलबजावणीस साधारण दोन वर्षे लागू शकतात. त्यामुळे नव्या पगारश्रेणीची अंमलबजावणी 2028 च्या आसपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर सध्याचा DA मूळ वेतनात विलीन होतो (employees)आणि DA पुन्हा शून्यापासून सुरू होतो. त्यामुळे जानेवारी 2026, जुलै 2026, जानेवारी 2027 आणि जुलै 2027 हे पुढील चार DA हप्ते तुमच्या भविष्यातील सुधारित मूलभूत वेतनाचा पाया ठरवतील. DA ची गणना AICPI-IW निर्देशांकानुसार केली जाते, ज्यासाठी सूत्र (12 महिन्यांचा AICPI सरासरी – 261.42) / 261.42 × 100 असे आहे.जानेवारी 2026 मधील केवळ 2% वाढ कर्मचाऱ्यांना निराश करू शकते, परंतु आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर पगार संरचनेत मोठे सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता