राज्यात थंडीचा कडाका सुरू झाल्यापासून टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे.(tomato) मार्गशीष महिन्याच्या अखेरचा आठवडा असूनही टोमॅटोच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका आठवड्यातच टोमॅटोचे दर थेट 80 रुपयांवर पोहोचले आहेत. सुरुवातीला एक किलो टोमॅटोचे दर प्रतिकिलो 16 ते 14 रुपयांवर 26 ते 60 रुपयांवर पोहोचले आहे.तर किरकोळ बाजारात हेच दर 80 रुपयांवर पोहोचले आहेत.एका आठवड्यातच टोमॅटोचे दर थेट दुप्पट झाल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेवगा, भेंडी, गवारचे दरही वाढले आहेत.वाटाणा, कोबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर मात्र नियंत्रणात आहेत.

त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात गारठा वाढल्यामुळं.(tomato) राज्यात दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी 186 टन टोमॅटोची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेने आवक कमी झाल्याने आठवडाभरातच दर दुप्पट झाले आहेत.किरकोळ बाजारातदेखील दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजात समितीमध्ये 446 टन वाटाण्याची आवक झाली असून आवक वाढल्याने दर 50 ते 70 रुपये किलोवरुन 30 ते 40 रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा 60 ते 70 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असलेल्या शेवग्याच्या दरात मात्र काहीशी घट झाली आहे.

टोमॅटोची बाजारातील आवकही मर्यादीत दिसत आहे. सध्या राज्यातील पुणे, .(tomato) नारायणगाव, पिंपळगाव बसवंत, मुंबई, नागपूर जिल्ह्यात आवक काहीशी अधिक दिसत आहे मात्र सरासरीपेक्षा कमीच आहे. इतर बाजारातही कमी प्रमाणात टोमॅटो येत आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. सध्या टोमॅटोला बाजारात सरासरी 2500 ते 3 हजार रुपये दर मिळत आहे. टोमॅटोचे दर पुढील काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून CNG आणि PNG च्या किमती कमी होणार
नवऱ्याने मर्यादा सोडली, गर्भवती बायकोला दारु पाजली आणि नंतर मित्रांना…धक्कादायक घटना
मोठी बातमी! धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार