कुठला पती आपल्या पत्नीला विकायचा विचार करु शकतो का?(limits)हो, उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये असच एक प्रकरण समोर आलय. एका महिलेने आपल्या पतीवर आरोप केले आहेत. नवऱ्याने माझे अश्लील फोटो त्याच्या मित्रांमध्ये व्हायरल केले असं महिलेने पोलिसांना सांगितलं. पत्नीने यावर आक्षेप घेतल्यानंतर तिला जबरदस्ती दारु पाजली. नंतर तुला विकून टाकणार अशी धमकी दिली. पत्नीने आपल्या पतीविरोधात करीमुद्दीनपुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.करीमुद्दीनपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणाऱ्या महिलेचं लग्न 3 वर्षांपूर्वी झालेलं. लग्नानंतर अडीच वर्ष सर्वकाही व्यवस्थित होतं. पण एक महिन्यापूर्वी नवऱ्याने अशी कृती केली की, ती ऐकून महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.

पत्नीचा आरोप आहे की, नवऱ्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्याच्या मित्रांना पाठवले.(limits) सोबत एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला.विवाहितेला या बद्दल समजल्यानंतर तिने नवऱ्याला या बद्दल जाब विचारला. त्यावेळी पतीने तिला मारहाण केली. नंतर तिला जबरदस्ती दारु पाजली. विवाहितेला दारुची नशा चढल्यानंतर तिने ऐकलं की पती कोणाला तरी सांगता होता, मी तुला कोणाला तरी विकून टाकेन. म्हणून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवलाय.विवाहित सध्या पाच महिन्यांची गर्भवती आहे. मात्र, तरीही नवरा तिला मारहाण करत असतो. नवऱ्याच्या सततच्या मारहाणीला कंटाळून ती आता तिच्या बहिणीच्या घरी निघून गेली आहे.

महिलेचं म्हणणं आहे की, आधी तिने पोलीसात तक्रार दिलेली.(limits) पण काही कारवाई झाली नाही. नंतर ती पोलीस अधीक्षकांना भेटली. त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. ‘मला न्याय मिळाला नाही, तर मी संपवून घेईन’ असं तिने लिहिलेलं.पोलीस अधीक्षकांनी पीडित महिलेचं म्हणण व्यवस्थित समजून घेतलं. त्यांनी करीमुद्दीनपुर पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. करीमुद्दीनपुर पोलिसांनी बीएनएस कलम 85, 115 (2) आणि 351 (2) अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणात पुढील चौकशी सुरु आहे.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?