भारताची माजी टेनिसपटून सानिया मिर्झा बऱ्याच वेळा चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिच्या सडेतोड उत्तर देण्याच्या शैलीने ओळखली जाते. सानिया मिर्झा दुबईला शिफ्ट होऊन बराच कालावधी होऊन गेला आहे. मात्र असं खु वेळा ती आपल्या मायदेशी येत राहते. सानिया मिर्झा सध्या पुन्हा चर्चेत आली असून टायमागील कारण (memory)म्हणजे तिची नुकतीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. जी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

सानिया मिर्झाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या कूल स्टाईलला तिच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. याशिवाय, तिच्या पोस्टच्या कॅप्शनने देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सानिया मिर्झाकडून शेअर करण्यात आलेल्या या मजेदार व्हिडिओमध्ये ती तिच्यासोबत मैत्रिणी देखील आहेत. ‘कहीं आग लगे लग जावे, कहीं नाग डसे-डस जावे, इस टूटे दिल की पीड़ा सही ना जाए…’ अशा गाण्यावर ती आणि तिच्या मैत्रिणी मी,मजेशीर पद्धतीने थिरकत आहेत. खरंतर सानिया मिर्झा सोशल मीडियावर सहसा अशा क्लिप्स कधी शेअर करताना दिसत नाहीत. पण यावेळी सानियाचा कूल अंदाज मात्र दिसून आला.

ताल या चित्रपटातलं गाणं असून तुटलेलं हृदय असा त्याचा अर्थ निघतो. पण सानिया आणि तिच्या फ्रेंड्सनी मात्र या गाण्यावर मजेशीर असा डान्स केला आहे. या गाण्यात (memory)सानिया व इतर मैत्रिणींनी त्यांच्या स्टेप्सनी सोशल मीडियावर कहर केला आहे. त्यासोबत एक कॅप्शन देखील लिहीली आहे, ‘कारण आता Cringe हेच नवे चलन आहे.’ सोशल मीडियावर या रीलला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.

युजर्सकडून सानियाच्या कूल स्टाईलचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. युजर्स म्हणाले की क्रिंज अंदाज तुझ्यावर खूप जास्त कूल दिसून येत आहे. तर काही युजर्स म्हणाले की तू खूप छान काम करत आहे. सानिया मिर्झा एखाद्या ब्रँड प्रमोशन किंवा कार्यक्रमासाठी भारतात आल्याची माहिती मिळत आहे.

सानिया मिर्झाच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर, सानिया तिचा मुलगा इझहान याचे ती एकटीच पालन पोषण करता आहे. ती तिच्या मुलासोबत दुबईमध्ये राहत असून तिथे तिची एक टेनिस अकादमी देखील आहे.

हेही वाचा :

जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश

PM किसानचा 21 वा हप्ता कधी येणार? महत्वाची माहिती समोर

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *