भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या 18 व्या हंगामात (scored)जबरदस्त बॅटिंग करत मोठ्या प्रमाणात धावा जमवल्या होत्या. तरीही, त्यापैकी 5 खेळाडूंना आशिया कप 2025 साठी संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे. या वर्षी आशिया कप 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये होणार असून, सामने दुबई आणि अबुधाबी येथे रंगतील. स्पर्धा टी20 स्वरूपात खेळवली जाणार असून, ती आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी निवड समिती लवकरच अंतिम यादी जाहीर करणार आहे. चर्चेत असलेल्या वगळल्या जाऊ शकणाऱ्या खेळाडूंमध्ये खालील नावे आहेत: केएल राहुल – दिल्ली कॅपिटल्सकडून 13 सामन्यांत 539 धावा, परंतु 2022 नंतर टी20i न खेळल्यामुळे आणि संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांच्या मजबूत स्पर्धेमुळे निवडीची शक्यता कमी.

यशस्वी जैस्वाल – राजस्थान रॉयल्सकडून 14 सामन्यांत 559 धावा, (scored)पण अभिषेक शर्मा- संजू सॅमसन जोडी ओपनिंगमध्ये स्थिर आणि शुबमन गिल शर्यतीत असल्याने यशस्वीला कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर विश्रांती मिळू शकते.
श्रेयस अय्यर – पंजाबला उपविजेता बनवत 650 धावा, तरी मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या यांच्यामुळे स्पर्धा तीव्र.
साई सुदर्शन – 15 सामन्यांत 759 धावा, इंग्लंड दौऱ्यात खेळला असला तरी आयपीएल कामगिरीवरून थेट निवड होईल की नाही हे अनिश्चित.
जसप्रीत बुमराह – दुखापतींमुळे सातत्याने विश्रांतीची गरज, विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी राखून ठेवण्याची शक्यता.

निवड समितीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होणार असून, चाहत्यांमध्ये (scored) ‘कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू’ याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!