इंडिगो एअरलाइन्स संकटामुळे देशातील हजारो नागरिकांना काही(ordinary)दिवसांपूर्वी मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यावेळी देशातील काही क्षेत्रांमध्ये असलेल्या मोजक्याच कंपन्यांची उपस्थिती ही ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू शकते असा तर्क अनेकांकडून लावण्यात आला होता. त्यात टेलिकॉम सेक्टरचे नावही घेण्यात येत होते. आता त्याच टेलिकॉम क्षेत्रातून ग्राहकांवर बोजा वाढवणारी बातमी समोर येत आहे. देशातील रिलायंस जियो , भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या टेलीकॉम कंपन्या येत्या वर्षात प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लान्सच्या किमतींमध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात.ही वाढ त्यांच्या नियमित टॅरिफ रिव्हिजनचा भाग असेल. या दरवाढीमुळे टेलिकॉम इंडस्ट्रीच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Morgan Stanley च्या रिपोर्टनु्सार, टेलिकॉम कंपन्या 2026 पर्यंत 4जी / 5जी प्लान्सच्या (ordinary)किमतींमध्ये 16 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात. यामुळे 2027 या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या कमाईत लक्षणीय वाढ होईल. तसेच, प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारे सरासरी उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. कंपन्या आपला महसूल वाढवण्यासाठी स्वस्त प्लान्स बंद करत आहेत आणि OTT सारखे फायदे महागड्या प्लान्समध्ये समाविष्ट करत आहेत. यामुळे ग्राहकांना मात्र नाईलाजाने महागडे प्लॉन्स घ्यावे लागतील, ज्याचा थेट परिणाम खर्चावर होतो.

या टॅरिफ हाइकचा सर्वात जास्त फायदा एअरटेल टेलिकॉम कंपनीला होईल.(ordinary) मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टनुसार, यापूर्वी जेव्हा किमती वाढल्या होत्या, तेव्हा इतर कंपन्यांच्या तुलनेत भारती एअरटेलला महसूल आणि EBITDA मध्ये अधिक फायदा झाला होता. एअरटेलने गेल्या काही वर्षांत रिलायंस जियो आणि वोडाफोन आयडिया यांच्यासोबत मिळून प्रीपेड प्लान्सच्या किमतींमध्ये तीन वेळा वाढ केली आहे. त्यावेळी कंपन्यांनी सांगितले होते की, टेलिकॉम व्यवसायाला फायदेशीर ठेवण्यासाठी आणि 5जी नेटवर्कमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे.2019 मध्ये किमती 15 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. 2021 मध्ये किमती 20 ते 25 टक्क्यांच्या दरम्यान वाढल्या होत्या. तर, गेल्या वर्षी 2024 मध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत किमती वाढवण्यात आल्या होत्या. यावर्षी देखील किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती, परंतु तसे अद्याप झालेले नाही.
हेही वाचा :
लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क