मुंबई महानगरात गेल्या काही दिवसांपासून हवेची पातळी अत्यंत खालावली(department)असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्वसनाच्या विकारांमध्ये झालेली मोठी वाढ आणि ढासळलेला हवा गुणवत्ता निर्देशांक यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली असून, मुंबई उच्च न्यायालयाने देखील या परिस्थितीवरून प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.शहरातील हवेचा दर्जा खालावल्यामुळे विशेषतः चेंबूर आणि वडाळा यांसारख्या उपनगरांमध्ये अमोनिया सारखे घातक वायू हवेत पसरले आहेत. या भागांत हवा गुणवत्ता निर्देशांक २१७ च्या पुढे गेल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. घसा दुखणे, सततचा खोकला आणि तीव्र ताप अशा तक्रारी घेऊन दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.

वाहनांची सतत वाढणारी संख्या आणि शहरात सुरू असलेले प्रचंड बांधकाम (department)यामुळे वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हवामानातील बदलांमुळे वाऱ्याचा वेग मंदावला असून, त्यामुळे प्रदूषित घटक शहराच्या वरच स्थिरावले आहेत. ही विषारी हवा मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत असून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता आक्रमक झाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना नोटिसा बजावल्या जात आहेत. वांद्रे पूर्व येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाले आहे.

या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना नसल्याचे निदर्शनास आले आहे.(department)यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस देऊनही सुधारणा न झाल्यामुळे आता या प्रकल्पाला ‘स्टॉप वर्क’ नोटीस देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने या गंभीर परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनाही या प्रकरणी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit