लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात या आठवड्यात भाजीपाल्याच्या दरांनी (doubled)मोठी उसळी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात प्रतिकिलो २० ते ३० रुपये असलेला टोमॅटोचा दर थेट दुप्पट होऊन ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आवक कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने हा दरवाढीचा फटका थेट गृहिणींच्या बजेटला बसत असल्याचे दिसून येत आहे. शेवग्याच्या शेंगांना पन्नास रुपयांना दोन नग असा दर असून गवारीने मात्र गेल्या वर्षभरापासून शंभर रुपयांच्या पुढील दराची परंपरा कायम राखली आहे.दुसरीकडे, पालेभाज्यांचे दर मात्र मोठ्या प्रमाणात घसरल्याने भाजीपाला अक्षरशः कवडीमोल भावात विकला जात होता. मेथी, शेपू, पोकळा, पालक, चाकवत, करडा, कांदापात यांसारख्या भाज्यांचे दर पाच ते दहा रुपये प्रतिपेंडीपर्यंत खाली आले आहेत.

हिरव्या वाटाण्याचाही दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलो इतका कमी झाल्याने(doubled)ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.वांगी, भेंडी, कारली, बिन्स, गाजर, फ्लॉवर, कोबी यांचे दर तुलनेने स्थिर असून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर बीट, गावठी गाजर आणि काटेरी काकडीला मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. मिरज, सांगली, गोकाक, संकेश्वर, बेळगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आल्याने बाजारात दिवसभर गर्दीचेच वातावरण होते.\

कांद्याच्या बाबतीत नव्या कांद्याची आवक वाढल्याचे चित्र असून त्यामुळे(doubled) दर तुलनेने नियंत्रणात आहेत. फळबाजारातही संत्री, सफरचंद, डाळिंब, केळी, सीताफळ यांचे दर प्रकारानुसार चढ-उतार झालेले दिसून आले. एकूणच भाजीपाला, फळे आणि काही प्रमाणात फुले यांची आवक कमी-अधिक झाल्याने बाजारात दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळत असून विक्रेते आणि ग्राहक दोघेही बदलत्या दरांचा अंदाज घेत व्यवहार करताना दिसत आहेत.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit