उत्तरेतून थंड वारे वाहत असल्याने राज्यात वर्षअखेरीस थंडी कायम आहे, (expected)मात्र थंडीचा जोर वाढणार असून नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमानात देखील वाढ-घट कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील ४ दिवस थंडी कायम राहणार आहे मराठवाडा, विदर्भ (expected)आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त जाणवण्याचा अंदाज आहे.वर्षाच्या अखेरीस तापमानचा पारा पुन्हा घसरला असून राज्यातील अनेक भागांत पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाज्या परभणी आणि धुळे येथे किमान (expected)तापमान ७ अंशांच्या खाली घसरले तर अहिल्यानगर आणि निफाडमध्येही तापमान ८ अंशांच्या खाली आले आहे. पुढील काही दिवस तापमानात चढ उतार दिसू शकतात, मात्र थंडीही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद होणार? तुमचा
चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा
90 टक्के आयफोन युजर्सना माहिती नाही हे गुप्त फिचर्स,