आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळं कोल्हापुरात पुराची समस्या
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार(flooding) असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे.‘आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची दक्षता घ्यावी, असा सूचनाही त्यांनी दिली.
अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. कोल्हापूरच्या संभाव्य पूरस्थितीचा उल्लेख करून त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना या बैठकीत केल्या.
‘‘हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा (flooding)जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही दक्ष राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी,’’ असे निर्देशही त्यांनी दिले.
बनावट बियाणे विक्रेते सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा,’’ असे निर्देश पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची दक्षता घ्यावी, असा सूचनाही त्यांनी दिली. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक(flooding) लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण विभागाचे उपायुक्त यांच्यासह कृषी सहसंचालक रावसाहेब भाबडे यांनी कार्यवाहीची माहिती दिली.
हेही वाचा :
सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक.
लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला.
भुजबळांचे हे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील ब्लेझर, चष्मा अन् दाढी.