लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे.(installment)त्यानंतर आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. डिसेंबर महिना संपून गेला तरीही अजून पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, फक्त नोव्हेंबरचे १५०० रुपये जमा झाले. त्यामुळे महिलांना हिरमोड झाला आहे.दरम्यान आता डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी येणार,(installment) दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हा हप्ता १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीपूर्वी जमा केली जाण्याची शक्यता आहे.मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात फक्त डिसेंबरचे पैसे जमा होऊ शकतात किंवा दोन महिन्याचे ३००० रुपये मिळू शकतात. याचसोबत जर डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र दिला नाही तर एका महिन्याचा हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी मिळू शकतो. दरम्यान, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे.(installment) केवायसी न केल्यास महिलांचा लाभ बंद होणार आहे. आता केवायसी करण्याचीही मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्या महिलांना फटका बसणार आहे. त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
हेही वाचा :
नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली