भारतातील स्मार्टफोन बाजारात मोठा बदल दिसून येत आहे. स्वस्त स्मार्टफोनची मागणी (smartphone market) घटल्यामुळे अनेक चिनी कंपन्यांच्या विक्रीत पहिल्यांदाच घसरण झाली आहे. विशेषतः Xiaomi, Oppo, OnePlus आणि Realme यांना या बदलाचा मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतात कार्यरत असलेल्या नऊ प्रमुख चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या एकत्रित महसुलात 4.5 टक्क्यांची घट झाली असून भारतात त्यांच्या महसुलात घसरण होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. याआधीच्या वर्षी याच कंपन्यांनी तब्बल 42 टक्के वाढ नोंदवली होती.

मार्केट इंटेलिजन्स कंपनी Counterpoint Research चे संचालक तरुण पाठक (smartphone market) यांच्या मते, 2025 मध्ये 20 हजार रुपयांखालील स्मार्टफोनचा व्हॅल्यू शेअर 38 टक्क्यांवरून 29 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच ग्राहक स्वस्त मोबाईल्सपासून हळूहळू दूर जात आहेत. या बदलाचा सर्वाधिक परिणाम स्पर्धात्मक किमतीत उत्पादने देणाऱ्या चिनी ब्रँड्सवर झाला आहे. 2023 मध्ये भारतीय बाजारात चिनी स्मार्टफोन ब्रँड्सचा रिटेल व्हॅल्यू शेअर 54 टक्के होता, तो 2025 मध्ये 48 टक्क्यांवर घसरला. मात्र विक्रीच्या संख्येनुसार त्यांचा बाजारातील हिस्सा 73 ते 75 टक्क्यांदरम्यान स्थिर राहिला आहे.
दुसरीकडे प्रीमियम सेगमेंटमध्ये (smartphone market) मोठी वाढ दिसून आली आहे. Apple आणि Samsung यांनी या बदलत्या ट्रेंडचा मोठा फायदा घेतला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये Apple ची भारतातील विक्री 18 टक्क्यांनी वाढून 79,378 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, तर Samsung ची विक्री 12 टक्क्यांनी वाढून 1.11 लाख कोटी रुपयांवर गेली. कोरियन घरगुती उपकरण निर्माता LG Electronics हिनेही 14 टक्के वाढ नोंदवली आहे.
चिनी कंपन्यांमध्ये मात्र Vivo ने तुलनेने चांगली कामगिरी करत महसुलात 11 टक्के वाढ नोंदवली. तज्ज्ञांच्या मते, Vivo कडे महागड्या मॉडेल्सचा मोठा पोर्टफोलिओ असून मजबूत ऑफलाइन रिटेल नेटवर्कमुळे त्याला फायदा झाला आहे. बाजारपेठ आता केवळ किमतीपेक्षा उत्पादनाच्या गुणवत्तेकडे आणि ब्रँड व्हॅल्यूकडे अधिक लक्ष देत आहे.
दरम्यान, मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतीमुळे स्मार्टफोनचे दरही (smartphone market) वाढले आहेत, ज्यामुळे एंट्री-लेव्हल आणि मिड-सेगमेंटमध्ये मंदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्मार्टफोन व्यवसायात कमकुवत कामगिरी झाल्याने चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या एकूण महसुलावर परिणाम झाला असला, तरी मोठ्या घरगुती उपकरणांच्या क्षेत्रात मात्र सकारात्मक वाढ दिसून आली आहे. Haier, Lenovo आणि Midea यांनी या क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे.
एकूणच भारतीय ग्राहकांच्या पसंतीत झालेला बदल स्मार्टफोन उद्योगासाठी महत्त्वाचा ठरत असून, प्रीमियम सेगमेंटकडे वाढता कल आणि ऑफलाइन विक्रीचे वाढते महत्त्व लक्षात घेता कंपन्यांना आपली धोरणे बदलावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण