सांगली शहर आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाच्या घटनेनं हादरून गेलं आहे.(murder) घरातून चालत निघालेल्या एका 22 वर्षीय तरुणावर चौघा हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने वार केले. पोटात, पाठीत आणि मांडीवर वर्मी घाव बसलेल्या तरुणाचा काही क्षणात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विष्णू सतीश वडर (वय 22 रा. वडर कॉलनी) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी संशयित हल्लेखोर आर्यन पाटील आणि विष्णू वडर यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

मृत विष्णू वडर आणि संशयित हल्लेखोर आर्यन पाटील, विष्णू वडर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. (murder)संशयितांमध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. आज विष्णू धोत्रे या त्याच्या मित्रांसोबत सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील जीए कॉलेज समोरून निघाला होता. यावेळी संशयित पाटील आणि वडर यांच्यासह अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. यात पाठीत, पोटात आणि मांडीवर वर्मी घाव बसल्याने धोत्रे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

विष्णू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनस्थळावरून पलायन केले.(murder) यावेळी परिसरातील नागरिकांनी विष्णू याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उप अधीक्षक भागवत, निरीक्षक भालेराव यांच्यासह विश्रामबाग पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली. दरम्यान, सदरचा खून हा पूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याची माहिती पुढे येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून विष्णूच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह
हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची