उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.(gang) एका ६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली. एवढेच नाही तर आरोपींनी अत्याचार करून तिला छतावरून खाली फेकले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. आरोपींचा नाव राजू आणि वीरू कश्यप असे आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक करण्यासाठी गेले तेव्हा आरोपींनी पोलिसांवर गोळीवर केला. पोलिसांनी प्रतिउत्तरात दोघांच्याही पायात गोळी झाडली आणि त्यांना ताब्यात घेतले. हि घटना बुलंदशहार येथे घडली.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती (gang) त्याच बिल्डिंगमध्ये राजू आणि वीरू कश्यप राहत भाड्याने राहत होते. त्यांनी दोघांनी मिळून पिडीतेसोबत घृणास्पद कृत्य केले. राजू हा बालरामपूरचा रहिवासी असून वीरू लखीमपूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडित चिमुकली ही गच्चीवर खेळात होती तेव्हा दोन्ही नराधमांनी तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर इमारतीच्या छतावरून खाली फेकलं. यात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर पॉक्सो अॅक्ट (gang) आणि बीएनएसच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपीला पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान दोन्ही आरोपी हे कावरा रोडवरील एका निर्माणाधीन कॉलनीमध्ये लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस तिथे त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. स्वयंरक्षणार्थ पोलिसांनी सुद्धा आरोपीच्या पायावर गोळ्या झाडल्या आणि या दोघांना जखमी केले.

त्यांना जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात (gang) उपचार सुरु आहे.पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करून तिला छतावरून ढेकूण तिची हत्या केल्याचे कबूल केले. पीडित त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगून टाकेल अशी भीती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी तुला छतावरून खाली फेकलं. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा