मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(grade) आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील मित्रावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी संबंधित विद्यार्थ्याची स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने शाळेतील मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका नामंकित शाळेतील ८वीत शिकणारा विद्यार्थी आपल्या वर्गमित्राशी अश्लील वर्तन करायचा. त्यानंतर पुन्हा त्याने वर्गमित्रावर त्याच्या घरा जवळील एका निर्जन ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पीडित मुलाने आपल्या आईला सांगितली. पीडित मुलाच्या आईने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केला.(grade)आणि तपासकार्यात भयानक गोष्ट समोर आली. फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी मुलाने पीडित मुलाला मारहाण केल्याचं समजलं. शिवाय बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. मात्र पीडित मुलाने घाबरून आपल्या कुटुंबियांना याबद्दल काही सांगितलं नाही.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली पुढील तपास सुरू केला आहे. तसेच शाळा अधिकारी आणि पालकांशी चौकशी करत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित शाळेतील मुले आणि पालकांमध्ये (grade)भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *