नवी मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने (committed) पत्नी आणि तिच्या मामाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटना नवी मुंबईतील रबाळे परिसरात घडली असून मृत तरुणाचे नाव विनोद तुपसौंदर (वर्षे २७) असे आहे. विनोदच्या पत्नीवर आणि तिच्या मामावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यामध्ये विनोदचा विवाह नाशिक (committed) येथील वैष्णवी नाटकर (वर्षे २५) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर विनोद आणि वैष्णवी हे दोघे काही काळ एकत्र राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये शुल्लक कारणांवरून खटके उडतं होते.वैष्णवी तिचा मामा संतोष ढगे याच्याशी मोबाइलवर वारंवार चॅटिंग करत होती, कॉलवर बोलत होती. ही बाब विनोदला समजल्याने त्यांच्यामध्ये वाद वाढले होते. वैष्णवी रागावून आपल्या आई-वडिलांकडे घर सोडून निघून गेली होती. त्याच दिवशी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वैष्णवीचे अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आले.

संतोष ढगे यानेच हे व्हिडीओ पाठवल्याचा संशय मृत विनोदच्या (committed) कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.या प्रकाराला कंटाळून विनोदने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं विनोदच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मामा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा