कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ६२ सीसीटीव्हीचे कॅमेरे आजही बंद आहेत.(working)आचारसंहिता सुरू झाली तरीही सीसीटीव्हीचे कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे ‘सेफसिटी’ तांत्रिकदृष्ट्या ‘अनसेफ’ झाली आहे.याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने, महापालिकेने आणि आचारसंहिता पथकानेही डोळेझाक केली आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या काळात सेफसिटीचा प्रस्ताव पुढे आला.पुढे टप्प्याटप्प्याने महापालिकेतील बजेट वापरून शहरातील प्रमुख चौक, मुख्य मार्ग, रिंगरोड अशी ठिकाणे सेफसिटी उपक्रमाच्या माध्यमातून सीसीटीव्हीने कव्हर केली गेली. त्यावेळी सेफसिटीचे कॅमेरे म्हणजे शहरावर लक्ष ठेवणारा तिसरा डोळा आहे, असे सांगण्यात आले.

यामुळे शहरातील चोऱ्या, खून, मारामारी, अवैध व्यवसाय, अवैध वाहतूक, (working)नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या तिसऱ्या डोळ्याचा उपयोग होणार असल्याचेही जाहीर केले होते.प्रत्यक्षात दुभाजकावरील पथदिव्यांवरूनच या सेफसिटीच्या कॅमेऱ्यांच्या वायर नेण्यात आल्या. यावेळी हा मुद्दा पुढे आला होता, मात्र कालांतराने त्यावर कोणीच बोलते झाले नाही. त्यामुळे आजही शहरातील ३४ ठिकाणचे कॅमेरे वायर तुटल्यामुळे बंद आहेत.
शहरात आचारसंहिता सुरू आहे. येथे निवडणूक प्रक्रिया करणाऱ्यांकडून प्रत्येक घटनेचे शूटिंग नव्याने टेंडर काढून केले जात आहे. नाक्यांवर वाहने तपासणी करतानाही शूटिंग होते. एकंदरीतच पारदर्शकता यावी, प्रत्येक घटना रेकॉर्डवर यावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून घेतलेली ही दक्षता आहे.प्रत्येक घटनेचे शूटिंग योग्य होते की नाही, याचीही खात्री जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका प्रशासक करीत आहेत. प्रत्यक्षात ही सर्व यंत्रणा बहुतांश ठिकाणी कॅमेऱ्यात कैद होईल, असे सेफसिटीचेच कॅमेरे बंद आहेत. त्याची कारणे वेगवेगळी असली तरीही कॅमेरे बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या ‘हालचाली’ सेफीसिटीच्या कॅमेऱ्यात टिपल्या जात नाहीत.
कॅमेरे तातडीने दुरुस्त होतील ?
अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अपघात करून पळून गेलेल्या(working) वाहनधारकांचा शोध लागला आहे. तिब्बल सीट, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ऑनलाईन दंड करण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचे ठरले आहेत.चोरीच्या घटनेतील संशयित कोणत्या मार्गे पळून गेलेत, याची माहिती घेण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठीही ‘तिसरा डोळा’ ठरले आहेत, मात्र ज्यावेळी या तिसऱ्या डोळ्यांची गरज आहे, त्याचवेळी अनेक ठिकाणचे कॅमेरे बंद आहेत.

आकडे बोलतात…
शहरात एकूण कॅमेऱ्यांची संख्या – १६७
काल रात्रीपर्यंत सुरू(working) असलेले कॅमेरे – १०५
बंद असलेले कॅमेरे – ६२
लाईट नाही म्हणून बंद – २०
कॅमेरे खराब झालेत म्हणून बंद – ८
केबल तुटली आहे म्हणून बंद – ३४
हेही वाचा :
नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली
Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22