महाराष्ट्रातील मिनी विधानसभेचा धुरळा कोणत्याही क्षणी उडण्याची शक्यता आहे.(schedule) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असणाऱ्या प्रलंबित १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज जाहीर होऊ शकतात. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषद निवडणुकींसाठी १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ दिलाय.राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे. आयोगाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदेचा आजपासून बिगुल वाजणार आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी – १९ जानेवारी ते २८ जानेवारी
नामनिर्देशनपत्रांची छाननी – २९-३० जानेवारी
उमेदवारी मागे घेण्याचा(schedule) अंतिम दिनांक – २ फेब्रुवारी
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक – ३ फेब्रुवारी
मतदानाचा दिनांक – १२ किंवा १३ फेब्रुवारी
मतमोजणी – १४ फेब्रुवारी २०२६
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, (schedule)पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण (schedule)असणार्या जिल्हा परिषद –
नंदुरबार – १०० टक्के
पालघर – ९३ टक्के
गडचिरोली- ७८ टक्के
नाशिक- ७१ टक्के
धुळे – ७३ टक्के
अमरावती – ६६ टक्के
चंद्रपूर – ६३ टक्के
यवतमाळ – ५९ टक्के
अकोला – ५८ टक्के
नागपूर – ५७ टक्के
ठाणे – ५७ टक्के
गोंदिया – ५७ टक्के
वाशिम – ५६ टक्के
नांदेड – ५६ टक्के
हिंगोली – ५४ टक्के
वर्धा – ५४ टक्के
जळगाव – ५४ टक्के
भंडारा – ५२ टक्के
लातूर – ५२ टक्के
बुलडाणा – ५२ टक्के
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्